आलापल्लीत दोन अजगरांना जीवदान किशोर उसेंडी ग्रामीण प्रतिनिधी गडचिरोली

 आलापल्लीत दोन अजगरांना जीवदान

आलापल्लीत दोन अजगरांना जीवदान किशोर उसेंडी ग्रामीण प्रतिनिधी गडचिरोली

किशोर उसेंडी ग्रामीण प्रतिनिधी गडचिरोली 

 आलापल्ली : येथील ग्लोबल मीडिया इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आणि दीगुडम येथील शेतशिवारात अजगर आढळण्याची घटना बुधवारी उघडकीस आली. यातील दोन्ही अजगरांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जंगलात सोडून जीवदान दिले.

खंड क्रमांक ८१ अंतर्गत येणाऱ्या ग्लोबल शाळेत अजगर असल्याची माहिती वन कर्मचाऱ्यांना मिळताच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक डी.एस. चिव्हाने व माजी सरपंच विजय कुसनाके यांनी सापाला पकडून तो स्वस्थ असल्याची खात्री केली. त्यानंतर त्याला जंगलात सुखरूपपणे सोडण्यात आले. दुसऱ्या घटनेत अहेरी वनपरिक्षेत्रातील दिगुडममधील शेत शिवारात अजगर आढळताच वनरक्षक खोब्रागडे व संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नारू नासनवार यांनी अजगर सापाला पकडून त्याची तपासणी केली.

0/Post a Comment/Comments