सरस्वती विद्यालय वढोली येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर

प्रमोद दुर्गे गडचिरोली वार्ता न्यूज 
सरस्वती विद्यालय वढोली येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर 

तालुका विधी सेवा समिती आणि तालुका अधिवक्ता संघ गोंडपीपरी यांचा संयुक्त पुढाकार 


महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांचे किमान समान कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर यांच्या निर्देशाने तालुका विधी सेवा समिती आणि तालुका अधिवक्ता संघ गोंडपिपरी यांचे संयुक्त विद्यमाने आज दिनांक 17 सप्टेंबर  रोज शनिवारला गोंडपीपरी तालुक्यातील वढोली येथिल सरस्वती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले.


या कायदेविषयक शिबिरात मादक पदार्थ ,लैंगिक गुन्हापासून बालकाचे संरक्षण आणि वाहतूक नियम यावर  मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी अध्यक्षस्थानी गोंडपिपरी येथील न्यायालयाचे न्यायाधीश   पी.जी लंबे , मार्गदर्शक म्हणून  गोंडपीपरी पोलीस स्टेशनचे ठानेदार जीवन राजगुरू ,  तालुका अधिवक्ता संघाचे अध्यक्ष आर.कांबळे, सचिव मंगेश काळे ,तर प्रमुख अतिथी म्हणून सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक ठावर सर यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

गोंडपीपरी
तालुका अधिवक्ता संघाचे अध्यक्ष राकेश कांबळे यांनी लैंगिक गुन्ह्यापासून बालकाचे संरक्षण विषयाबद्दल सविस्तर  माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अधिवक्ता संघाचे सचिव  एडवोकेट मंगेश काळे यांनी मादक पदार्थ यावर उचित मार्गदर्शन केले तर  गोंडपिपरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार  जीवन  राजगुरू यांनी वाहतूक नियमावर कायदेविषयक माहिती दिली. 
महोदय पी.जी लंबे साहेब 
 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी गोंडपिपरी यांनी अध्यक्ष भाषनात  कायद्याबाबतची माहिती सांगत विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दर्शन केले.
या कायदेविषयक जनजागृती शिबिर कार्यक्रमाचे सूत्र संचालन पी.रामटेके तर
प्रस्तावना ऍडओकेट आर.कांबळे यांनी सांगितली.
तर कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या मान्यवर ,प्रमुख अतिथी, मार्गदर्शक  ,शिक्षक यासविद्यार्थी  विद्यार्थीनीचे आभार 
 पीए चौधरी सर  यांनी  केले.

0/Post a Comment/Comments