राष्ट्रिय शहिद वन दिनानीमीत्य आलापल्ली येथे शहिदांना आदरांजली वाहिली

राष्ट्रिय शहिद वन दिनानीमीत्य आलापल्ली येथे शहिदांना आदरांजली वाहिली

किशोर उसेंडी प्रतिनिधी 
गडचिरोली वार्ता न्यूज

आलापल्ली : राष्ट्रीय वन शहीद दिनानिमित्त वनसंपदा भवन आलापल्लीच्या प्रांगणात वन शहीद स्मारक येथे वन विभाग, आलापल्ली, भामरागड व सिरोचा वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे वन शहीदांना स्मरण करून आदरांजली वाहिली.
आल्लापल्ली वनविभाग आल्लापल्ली मा. बुधनवार सर सहाय्यक वनसंरक्षक अल्लापल्ली मा. बडेकर सर, विभागीय वन अधिकारी अहेरी सिरोंचा वनविभाग व सर्व वन परिक्षेत्र अधिकारी श्री शेरेकर कुमारी आरती मडावी, कुमारी भावना अलोने, वन हुतात्मा स्मारक समितीचे श्री पूनमचंद बुधावार, उपाध्यक्ष श्री वरसल खान समिती सदस्य प्रदीप कैदलवार, श्री. बुद्धवार, उपाध्यक्ष प्रदीप कैदलवार, श्री ईश्वर मांडवकर श्री श्रीनिवास आडे, वन विभागाचे सर्व प्रादेशिक व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
जंगलाचे रक्षण करताना गस्त घालताना, वन्य प्राण्यांची शिकार करताना, विविध प्रजातींच्या झाडांची आणि इतर वनसंपत्तीची तस्करी करताना देशात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ आलापल्ली येथे मोठे स्मारक बांधण्यात आले असून या स्मारकावर 8 शहीद वनकर्मचाऱ्यांची नावे सुवर्णाक्षरात कोरलेली आहेत.

0/Post a Comment/Comments