गिट्टीवरून दुचाकी घसरली:युवक जखमी वढोली - गोंडपिपरी मार्गावर गिट्टीचा सळा



गिट्टीवरून दुचाकी घसरली:युवक जखमी

वढोली - गोंडपिपरी मार्गावर गिट्टीचा सळा 

एस.आर.के कंट्रकक्षण च्या गलथन कामामुळे अपघातात वाढ

गडचिरोली वार्ता न्यूज 


गोंडपिपरी-खेडी मार्गाचे काम दोन - तीन वर्षांपासून कासवगतीने सुरू असून अनेक अपघात या मार्गावर घडत आहे.
आज दि.(१२) MH 33 A A2396 या दुचाकीने वढोली वरून गोंडपिपरी जात असताना अमित मडावी (धामनपेठ) रस्त्यावर गिट्टीचा सळा पसरून असल्याने दुचाकी अनियंत्रीत झाल्याने पडला त्यात तो जखमी झाला.गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात अमितला उपचारासाठी दाखल करण्यात आले.वढोली-गोंडपिपरी रस्ता दोन्ही बाजूने खोदण्यात आला असून कुठेही रस्ता दुभाजक व दिशा दर्शक फलक न लावल्याने रस्त्यावर गिट्टी पसरून असल्याने रोज या मार्गावर अनेक अपघात घडत आहे.कंत्राटदाराच्या निष्काळजी पणामुळे अनेकांना याआधी जीव गमवावा लागला अनेकांना अपंगत्व आले बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष देऊन वढोली- गोंडपीपरि मार्गावर रस्ता खोदकाम करून असलेल्या ठिकाणी दोन्ही बाजूने दिशा दर्शक फलक लावावे रस्त्यावरील गिट्टीचा योग्य विल्हेवाट लावावा अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार यांनी केली आहे

0/Post a Comment/Comments