अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई व वनहक्क दाव्यांबाबत माजी आमदार आत्राम यांच्यासोबत चर्चा


 राजाराम खांदला येथील शेतकरी व आविस पदाधिकाऱ्यांनी घेतली माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची भेट…..


अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई व वनहक्क दाव्यांबाबत माजी आमदार आत्राम यांच्यासोबत चर्चा


किशोर उसेंडी

गडचिरोली वार्ता न्यूज 



आल्लापल्ली….अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला ग्राम पंचायत परिसरातीलअतिवृष्टीमुळे बाधित झालेले शेतकरी,वनहक्क दाव्यांचे शेतकरी व आविस पदाधिकाऱ्यांनी आविस नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.


राजाराम खांदला ग्राम पंचायत हद्दीतील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीचे नुकसान भरपाई मिळाले नसल्याचे व वनहक्क दावे सादर केल्यानंतर पट्टे मिळायला विलंब होत असल्याचे माजी आमदार आत्राम यांचे निदर्शनास शेतकरी व आविस पदाधिकाऱ्यांनी आणून दिले. यावेळी माजी आमदार आत्राम यांनी राजाराम खांदला ग्राम पंचायत हद्दीतील शेतकऱ्यांचे समस्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आवश्यक तोडगा काढु,असे आश्वासन दिले. माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे सोबत चर्चा करतांना आविस सल्लागार माधव कुळमेथे, रमेश पोर्टेत, व्येंकनां कडार्लावार, श्रीनिवास ओडनालवार, सुधाकर आत्राम,विनायक वेलादी,माजी सरपंच दिलीप गंजीवार, विजय कुसनाके,जुलेख शेख,संदीप बडगे सह शेतकरी उपस्तीत होते

0/Post a Comment/Comments