अंब्रिशराव आत्राम (माजी आमदार अहेरी) यांनी केली आर्थिक मदत


अंब्रिशराव आत्राम (माजी आमदार अहेरी) यांनी केली आर्थिक मदत

अक्षय गोंगले 
गडचिरोली वार्ता न्यूज

मुलचेरा: १६ सप्टेंबर
तालुक्यातील देवनगर येथील गौतम बिश्वास बरेच दिवसांपासून हृदयरोगाने ग्रस्त होते. घरची परिस्थिती बिकट असल्याने उपचारासाठी अडचणीचा सामना करावा लागत होता. ही बाब देवनगर येथील भाजपा कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी ही माहिती माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराजांच्या दरबारी पोहोचवली.
त्यानंतर अम्ब्रिशरावांनी आर्थिक मदत दिली.माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव महाराज यांचे प्रतिनिधी म्हणून भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष तथा ग्रामपंचायतचे उपसरपंच संजित सरकार, भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष किशोर मल्लिक यांच्या हस्ते गौतम बिश्वास यांना आर्थिक मदत देण्यात आली. पुढील काळात अडचण आल्यास पुन्हा मदत करू, असे आश्वासन दिले.
याप्रसंगी विवेकानंदपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच तपन
मल्लिक यांच्यासह समीर बैरागी, भाजपा कार्यकर्ते, गावातील नागरिक उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments