काँग्रेसला 'भारत जोडो' ची नव्हे तर,'काँग्रेस जोडो'ची गरज आहे.! प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल


काँग्रेसला 'भारत जोडो' ची 
नव्हे तर,'काँग्रेस जोडो'ची गरज आहे.!

प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल

गडचिरोली वार्ता न्यूज 

काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो अभियान सुरू केले आहे..हे अभियान अशावेळी सुरू करण्यात आले की ज्यावेळी अनेक दिग्गज काँग्रेस पक्षाला रामराम सोडून जात आहे,अनेक काँग्रेसचे जेष्ठ नेते काँग्रेस सोडून जात आहे.मोदी पंतप्रधान झाल्यापासून काँग्रेस पक्षाची वाताहत होत आहे. त्याला काँग्रेसचे अंतर्गत धोरण,राहुल व सोनियाचे कमकुवत नेतृत्व,घराणेशाही,काँग्रेस पक्षातील भ्रष्टाचार, इतर जेष्ठ नेत्यांना डावलणे,ही कारणे कारणीभूत असून काँग्रेस पक्षाला खरी गरज 'भारत जोडो'ची नव्हे तर  'काँग्रेस जोडो' ची आहे.खर तर राहुल गांधींनी भारत जोडो पेक्षा काँग्रेस जोडो अभियान राबवायला  हवे होते. काँग्रेस जोडो अभियानांतर्गत काँग्रेस पक्षाला कायमचा अध्यक्ष, संघटनात्मक  निवडणुका,काँग्रेसला गांधी घराण्यापासून मुक्त ,तरुणांना वाव या सारख्या करून काँग्रेस पक्षाच्या  नवं चैतन्य निर्माण करता आले असते.मात्र काँग्रेस पक्षाच्या संघटन शक्तीवर भर देण्यापेक्षा राहुल गांधी यांनी
७ सप्टेंबरपासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा अभियानाला प्रारंभ केला आहे. कॉंग्रेसची ही भारत जोडो यात्रा कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत असणार आहे. त्यात महाराष्ट्रातील नांदेड आणि जळगाव या दोन ठिकाणी राहुल गांधी यांच्या जाहीर सभा होणार आहेत. मात्र, राहुल गांधी यांची ही भारत जोडो यात्रा पक्ष अत्यंत कठीण कालावधीतून जात असताना निघत असल्यानं राहुल गांधी यांची ही यात्रा कॉंग्रेसला पुन्हा उभारी देणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेस कोमात गेली आहे. कॉंग्रेसचे अनेक महत्त्वाचे नेते पक्ष सोडून गेले आहेत... काही पक्ष सोडण्याच्या रांगेत आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाचा प्रश्न प्रलंबित आहे. राहुल गांधी स्वत: तीन वर्षापासून कॉंग्रेसचं अध्यक्ष नाकारत आले आहेत.

नॅशनल हेराल्डच्या कथित प्रकरणात केंद्रीय यंत्रणांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी केली तेव्हाच पक्षात जरासा पुन्हा जीव आल्याचं चित्र निर्माण झाल्याचं दिसून आलं. मात्र, गांधी घरातील व्यक्तींसाठी पक्षाने ज्या पद्धतीने आंदोलन केले. त्या पद्धतीने पक्षाने जर जनतेच्या समस्यांसाठी आंदोलन केलं तर पक्ष उभा राहू शकला असता.मात्र पक्ष नेतृत्वाने व इतर नेत्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांपेक्षा गांधी घराण्याला महत्व देत घराणेशाहीचे पुन्हा एकदा समर्थन केले.

कॉंग्रेसची ही भारत जोडो यात्रा हा केवळ काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न नसून राहुल गांधीना स्वतःची जनमानसात प्रतिमा निर्माण करायची आहे.  हे विसरुन चालणार नाही. त्यामुळं राहुल गांधी यांच्या सोबतच कॉंग्रेसला देखील या भारत जोडो यात्रेतून काय मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.

किती दिवस चालणार यात्रा...

काँग्रेसची ही यात्रा ७ सप्टेंबरपासून सुरू झाली असून १५० दिवसांत ही यात्रा १२ राज्यांतून जाणार आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी प्रभावीपणे मुद्दे मांडत आहे. आपल्या विचारांचा प्रभाव आणि प्रचार जनतेपर्यंत घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे ते यशस्वी ठरले तरच या यात्रेतून कॉग्रेस पक्षाला काही तरी मिळेल.अन्यथा काँग्रेसला गळती लागायला फारसा वेळ लागणार नाही.
राजकीय विश्लेषकांनी काँग्रेसमध्ये तरुणांना फारशी संधी मिळत नसल्याचीही खंत व्यक्त केली आहे. वेळ पडली तर काँग्रेसने पक्षाचे नेतृत्व दुसऱ्या नेत्यांकडे सोपवावे अशीही त्यांची भावना आहे.मात्र अस करण्यासाठी राहुल गांधी तयार होतील का.?

दरम्यान,काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली आहे. असे असले तरी कॉंग्रेसची सूत्रे  कोण हाती घेणार हे स्पष्ट झालेलं नाही. राहुल गांधी पुन्हा अध्यक्ष होतील की सुमारे २५ वर्षांत गांधी घराण्याव्यतिरिक्त कोणी तरी काँग्रेस अध्यक्ष होईल याबद्दल स्पष्टता नाहीय. कॉंग्रेसमध्ये असंतोष निर्माण झाल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी पक्ष सोडला. कॉंग्रेसनं ‘भारत जोडो’ ऐवजी ‘काँग्रेस जोडो’वर लक्ष केंद्रित करावं, असं ते म्हणाले होते. “राहुलच्या मनात काय आहे ते कोणालाच माहीत नाही.” हे विधानही आझादांनी केलं होतं.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत ज्येष्ठ नेते शशी थरूर म्हणाले की, “निवडणुकीसाठी उभं राहायचं की नाही हे ठरवण्यासाठी त्यांच्याकडे आणखी तीन आठवडे आहेत.” थरूर म्हणाले की, “आजपर्यंत मी माझ्या उमेदवाराची पुष्टी किंवा नाकारलेली नाही.” उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर आहे. राहुल गांधींविरोधात उमेदवार मिळाला तर १७ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. १९ ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.


९५६१५९४३०६

0/Post a Comment/Comments