देशातील पहिली उपग्रह आधारित इंटरनेट सेवा सुरू प्रा डॉ सुधीर अग्रवाल


देशातील पहिली उपग्रह आधारित इंटरनेट सेवा सुरू

प्रा डॉ सुधीर अग्रवाल

देशातील पहिली उपग्रह आधारित इंटरनेट सेवा सुरू करून भारताने आत्मनिर्भरतेकडे आणखी एक पाऊलं टाकले आहे.
आजच्या काळात इंटरनेट ही गरज बनली आहे, छोट्या-मोठ्या प्रत्येक कामासाठी आजकाल इंटरनटचा वापर होतोय. मात्र अद्याप देखील जगभरात अशी बरीच ठिकाणे आहेत जेथे अद्याप इंटरनेट सेवा, ऑप्टिकल फायबर पोहोचले नाही, अशा सर्व ठिकाणी सध्या चर्चेत असलेले सॅटेलाईट इंटरनेट उपयुक्त ठरू शकते.  जेथे लोकांना अजून हायस्पीड इंटरनेटची सुविधा मिळत नाही तेथे सॅटेलाईट इंटरनेट उपयोगी ठरू शकते. एलोन मस्क
यांचीकंपनी स्टारलिंक ही सेवा सुरु करेल असे बोलले जात होते. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या आकाशात स्टारलिंकचे सॅटेलाईट एका ओळीने दिसले होते. परंतू, या स्टारलिंकच्या आधीच देशाची अंतराळ संस्था ISRO ने बाजी मारली आहे. यामुळे भारताला स्वदेशी अशी इंटरनेट सेवा मिळाली आहे.


देशातील पहिली उपग्रह आधारित इंटरनेट सेवा इस्रो आणि ह्युजेस कम्युनिकेशनने सुरू केली आहे. या उपग्रह आधारीत हाय-थ्रुपूट इंटरनेट सेवेचा (एचटीएस) व्यावसायिक शुभारंभ देशात नवी क्रांती घेऊन आल्याचा दावा केला जातो यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात जेथे इंटरनेट सुविधा पोहोचविणे अद्याप अशक्य होते, तेथेही ब्रॉडबॅण्ड नेटवर्क पोहोचणार आहे. तसेच ब्रॉण्डबॅण्ड नेटवर्क अधिक भक्कम व वेगवान होणार आहे. जगात अनेक देशांना अशी उपग्रह आधारित इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकने याआधी भारतीय बाजारातही पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र परवान्याशिवाय बुकींग सुरू करणाऱ्या स्टारलिंकबाबत भारत सरकारने कठोर भूमिका घेतल्यावर स्टारलिंकने गाशा गुंडाळला होता. या पार्श्वभूमीवर इस्रोने आपल्या उपग्रह साखळीचे बळ पुरवून ह्युजेस कम्युनिकेशन (एचसीआय) या अमेरिकी कंपनीच्या सहाय्याने ही इंटरनेट सेवा सुरू केली आहे.

नेमकं काय आहे सॅटेलाईट इंटरनेट?

स्टारलिंक हा एक सॅटेलाईट इंटरनेट प्रोजेक्ट आहे, यामध्ये सॅटेलाईटच्या मदतीने इंटरनेट सर्व्हिस दिली जाते ज्यासाठी कुठल्याही ग्रांउड इन्फ्रास्ट्रक्चरची गरज पडत नाही. कुठलेही टॉवर किंवा वायर तसेच इतर कुठलेही माध्यम नसताना लेसर बीम वापरून डेटा ट्रान्सफर केला जाते. स्टारलिंकच्या वेबसाइटनुसार या सॅटेलाईट इंटरनेटती प्री-बुकिंग $ 99 म्हणजेच सुमारे 7,200 रुपयांना सुरू झाली आहे. सध्या हा दर फक्त बीटा ग्राहकांसाठी आहे. जेव्हा ही सेवा सामान्य लोकांसाठी उपलब्ध होईल तेव्हा ही किंमती वर किंवा खाली जाऊ शकते.

सॅटेलाईट इंटरनेट कसे चालते?
स्टारलिंक ही सॅटेलाईट आधारित इंटरनेट सेवा आहे जी आपल्या घरांमध्ये सिग्नल पाठवण्यासाठी सॅटेलाईटचा वापर करते. यासाठी लोअर ऑर्बिट सॅटेलाईटचा वापर केला जातो. या लोअर ऑर्बिट सॅटेलाईटचा लेटन्सी रेट म्हणजे एका पॉंइटपासून दुसऱ्या पॉंइट पर्यंत डेटा पोहचवण्यासाठी लागणारा वेळ खूपच कमी असतो. यामुळे, ऑनलाइन बफरिंग, गेमिंग आणि व्हिडिओ कॉलिंगची क्वालीटा कित्येक पटीने चांगली होते. विशेष म्हणजे स्टारलिंकचे काम डिश टीव्ही सेवांसारखेच आहे. स्टारलिंक इंस्टॉल करण्यासाठी डिशचा वापर केला जातो, ज्याला मिनी सॅटेलाईटकडून सिग्नल मिळतात. जून 2021 पर्यंत पृथ्वीभोवती सक्रिय असलेल्या स्टारलिंक सॅटेलाईटची संख्या 1,500 पेक्षा जास्त होती.भारतातील बहुतेक इंटरनेट वापरकर्ते फायबरवर अवलंबून आहेत, जे सॅटेलाईट इंटरनेटच्या तुलनेत हाय स्पीड इंटरनेट देते. मात्र स्टारलिंकच्या इंटरनेटसाठी तुम्हाला वायर्ड कनेक्शनची गरज पडत नाही. जगभरात कुठेही ते सहजपणे मिळवता येते. फायबर कनेक्शनच्या बाबतीत मात्र अडचणी येऊ शकतात. सध्या स्टारलिंकचा इंटरनेट स्पीड 50 एमबीपीएस ते 150 mbps दरम्यान आहे. तसेच ती 300 mbps पर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, ग्रामीण भाग, लहान शहरे किंवा अगदी दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसाठी सॅटेलाईट इंटरनेट हा चांगला पर्याय असू शकतो, कारण अशा ठिकाणी सेल्युलर टॉवरसारख्या पायाभूत सुविधांची गरज पडणार नाही. तसेच चक्रीवादळ, भूकंप आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा धोका असणाऱ्या क्षेत्रांसाठी हे उपयोगी ठरेल.

९५६१५९४३०६

0/Post a Comment/Comments