सात दिवसाच्या बाळाला रस्त्यात टाकून पळ काढणार्या निर्दयी बापाला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या केले स्वाधीन

प्रमोद दुर्गे गडचिरोली वार्ता न्यूज 
सात दिवसाच्या बाळाला  रस्त्यात टाकून पळ काढणार्या निर्दयी बापाला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या केले स्वाधीन 

गोंडपीपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील घटना

गोंडपीपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे आज दि.17 सप्टेंबर रोज शनिवार ला   एका निर्दयी बापाने चक्क आपल्याच  बाळाला भर रस्त्यावर टाकून पळ काढला 
दरम्यान  गावकऱ्यांनी  पकडून गोंडपीपरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.


वर्षभरापूर्वीच गोंडपीपरी तालुक्यातील 
शिरशी बेरडी येथील कुमोद पौरकर वय 34 वर्ष यांच्याशी  विट्ठल वाडा गावातील शालीक देवतळे यांची मुलगी भाग्यश्रीचा विवाह झाला. प्रेमाने संसार सुरू होता. दरम्यान
 सात दिवसापूर्वी भायश्री ने ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे  गोंडस बाळाला जन्म दिला.
भायश्री दवाखाण्यातुन सुट्टी झाल्यावर बाळाला घेऊन  माहेरी आली.  
 बाळाला पाहण्याच्या उद्देशाने   वडील आले.आणि बाळाला  घेऊन बसस्थानकाकडे निघाल्याची माहिती होताच
भायश्रीसह तिचे कुटुंबिय बाळाला शोध घेतला असता वडीलच बाळाला घेऊन जात असल्याची माहिती मिळाली पाठलाग केला मात्र तो पर्यंत वडील मुलीला घेऊन जिला.परिषद उच्च प्राथमिक शाळे पर्यन्त निघून गेले दरम्यान आरडाओरड करताच बाळाला भर रस्त्यात टाकून पळ काढला.समोरून घेणाऱ्या नागरिकानीं त्याला पकडले. 
आणि ग्रामपंचायत विठ्ठलवाडा येथे आणण्यात आले आहे.
घटनेची माहिती गोंडपीपरी पोलिसांनी देण्यात आली.
पोलीस घटनास्थळ गाठून निर्दयी वडिलाला ताब्यात घेतले आहे ..
पुढील तपास सुरू आहे.

भर रस्त्यात सातदिवसाचा बाळाला जोरात टाकल्याने बाळाची हालचाल बंद झाली.
लागलीच उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे दाखल करण्यात आले आहे.
मेंदूला जबर मार लागल्याने चंद्रपूर येथील  जिल्हा  सामान्य रुग्णालयात रेफेर करन्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments