सरपंच व ग्रामसेवक यांनी केली आर्थिक अफरातफर....... उदापूर येथील प्रकार. पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल


सरपंच व ग्रामसेवक यांनी केली आर्थिक अफरातफर....... उदापूर येथील प्रकार.



पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल


पशु मित्र प्रकाश जिवानी
गडचिरोली वार्ता न्यूज 




ग्रामपचायत उदापुर येथील तत्कालीन ग्रामसेवक व सरपंच यांचे कार्यकाळातील चौकशी पंचायत समिती ब्रम्हपुरी येथील विस्तार अधिकारी  जयेंद्र  राउत यांनी केली असुन त्यांनी चौकशी अहवाल पंचायत समीती ब्रम्हपुरी येथे सादर केला असता सदर चौकशी अहवाल पुढील कारवाईसाठी पंचायत समीती ब्रम्हपुरी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत ) जिल्हा परिषद , चंद्रपुर 
यांना सादर केलेला होता .
 त्या अनुषंगाने सदर प्रकरणी प्रशासकीय कारवाई दि . 31/03/2022 ला तत्कालीन ग्रामसेवक. दिनेश श्रावण येरणे यांची एक वार्षीक वेतन वाढ कायम स्वरूपी थांबवीण्यात आली तसेच त्यांचेकडुन 16,200 रू . एवढया रक्कमेवर अपहार केलेल्या तारखेपासुन 7.40 टक्के दराने व्याज वसुल करण्यात यावे असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपुर यांनी पारीत केलेला आहे . सदर प्ररणाची चौकशी करणारे जयेंद्र कृष्णजी राउत विस्तार अधिकारी पंचायत समिती ब्रम्हपुरी यांनी केलल्या चौकशी मध्ये असे दिसुन आले की , ग्रामपंचायत उदापुर , पंचायत समीती ब्रम्हपुरी जि . चंद्रपुर येथे सन 2010 ते 2015 या काळात सरपंच पदावर योगेश्वर तात्याजी तुपट व ग्रामसेवक म्हणुन दिनेश श्रावण येरणे हे कार्यरत असतांना ग्रामपंचायत उदापुर येथे दि . 10/02/2014 ला ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंर्तगत पाणीपुरवठा नळ योजना सुरू झाली असुन ग्रामपचायत उदापुर येथे दोन ग्रापंचायत कर्मचारी रामभाउ नाकतोडे व हिरालाल माकडे हे हाते.
 त्यापैकी हिरालाल माकडे यांचेकडे दिवाबत्ती व पाणी पुरवठा काम दिलेले होते . ग्रामपंचायत उदापुर यांनी सन 2014 मध्ये ज्ञानेश्वर देविदास ठाकुर उदापुर यांना नळ योजना मदतनिस म्हणुन में 2014 मध्ये 100 रू प्रती दिवस कामावर ठेवण्यात आले होते. हजेरीपट रजिस्टर मध्ये ज्ञानेश्वर देविदास ठाकुर यांना 30 दिवस 100  रू प्रमाणे 3000 रू . खतवुन व्हाउचर क्र 8 दि 10/06/2014 धनादेश क्रमांक 649242 दि . 10/06/2014 नुसार दिल्याचे दिसुन आले परंतु हजेरीपटावर त्यांची स्वाक्षरी घेण्यात आली नाही. यात सचिव दिनेश श्रावण येरणे हे दोशी आढळुन आले आहेत . हजेरीपटावर गुलाब कांचन मेश्राम या मजुराने हात पंपाजवळील मुरूम पसरविने, हात पंपाचा परीसर स्वच्छ करून ब्लीचींग पावडर टाकणे हे साडेतीन दिवस काम केले. प्रती दिवस 200 रु . प्रमाणे 700 रू . दिल्याचे दिसुन येते . परंतु मजुर गुलाब कांचन मेश्राम हे 30 ते 35 वर्षापुर्वी मरण पावले असुन उदापुर गावात या नावाचा कोणीही माणुस जिवंत नाही . अशा मयत मजुराच्या नावाने खोटे हजेरीपट तयार करून 700 रू . ची अफरातफर केल्याचे दिसुन येत आहे . जुन 2014 मध्ये ज्ञानेश्वर देविदास ठाकुर उदापुर या मजुराचा हजेरीपटावर 30 दिवस प्रती दीवस 100  रू प्रमाणे एकुण 3000 रु . असे एकुण 6000 रु . धनादेश क्रमांक 649249 दि .28 / 08 / 2014 व्हाउचर क्र . 21 नुसार अदा केल्याचे दिसुन येते . परंतु सदर मजुर यांनी जुन व जुलै मध्ये कोणतेही काम केले नसल्याचे दिसुन आले आहे . उदापुर येथील हजेरीपटावर नानेश्वर देविदास ठाकुर यांना 5 दिवस 100 रु . प्रमाणे 1000 रू दिल्याचे व्हाउचर क्र . 45 दि . 21/01/2015 ला दिल्याचे दिसुन येते परंतु मजुराची त्यावर स्वाक्षरी नाही . अशा प्रकारे ग्रामपंचायत उदापुर येथील तत्कालीन ग्रामसेवक व सरपंच यांनी संगणमताने  ज्ञानेश्वर देविदास ठाकुर 3000 रू . हजेरीपटावर स्वाक्षरी नाही . गुलाब कांचन मेश्राम 700 रू . दिले असुन ते मयत आहेत . नानेश्वर देविदास ठाकुर 1000 रू असून व्हाउचरवर स्वाक्षरी नाही. ज्ञानेश्वर देविदास ठाकुर 2100 रू . दिले परंतु नानेश्वर व ज्ञानेश्वर हे एकच व्यक्ती आहे  ज्ञानेश्वर देविदास ठाकुर यांना 2600 रू . दिले परंतु नानेश्वर व ज्ञानेश्वर एकच व्यक्ती आहे . विठ्ठल माकडे  देवीदास ठाकुर 800 रू . व्हाउचरवर स्वाक्षरी नाही. ज्ञानेश्वर देविदास ठाकुर 6000 रू . दिले आहे परंतु कामाचे स्वरूप दाखवीले नाही . अशा प्रकारे ग्रामपंचायत कार्यालय उदापुर येथील तात्कालीन सरपंच योगेश्वर तात्याजी तुपट व तत्कालीन ग्रामसेवक दिनेश श्रावण येरणे यांनी सन 2010 ते 2015 या कालावधीमध्ये कार्यरत असतांना संगणमताने पाणी पुरवठा फंडाचे 16,200 रू . ची मजुरांची स्वाक्षरी न घेता तसेच मयताच्या नावाने बील काढुन बोगस हजेरीपट तयार करून शासणाच्या पैशाची अफरातफर करून खोटे दस्तऐवज तयार केल्याचे चैकशीमध्ये निष्पन्न झाले असल्याने त्याचेवर कायदेशीर कारवाई करण्याकरीता पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे

0/Post a Comment/Comments