गोंडपीपरी पोलीस स्टेशनला विठ्ठलवाडा येथील महिलांची धडक गावातील अवैध दारूविक्री बंद करण्याची केली मागणी

प्रमोद दुर्गे गडचिरोली वार्ता न्यूज 
गोंडपीपरी पोलीस स्टेशनला विठ्ठलवाडा येथील  महिलांची धडक

गावातील अवैध दारूविक्री बंद करण्याची केली मागणी

ठाणेदारांना दिले शेकडो महिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन

गोंडपीपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री सुरू असून ती तात्काळ बंद करण्यात यावी,या मागणीला घेऊन विठ्ठलवाडा येथील महिलांनी तंटामुक्त समिती,ग्रामपंचायत सरपंच,सदस्य यांचे सह पोलीस स्टेशनला धडक देऊन मागणीचे निवेदन ठाणेदार राजगुरू यांना दिले

विठ्ठलवाडा हे  राजकीय,सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रात नावाजलेला गाव. या गावाची ओळख सधन शेतकर्याचे गाव म्हणून तालुक्यात ओळखल्या जाते.शेती हा मुख्य व्यवसाय असून शेतीच्या उत्पन्नातूनच आपली उपजीविका करून अगदी गुण्या गोविंदाने सर्व नांदतात.मात्र चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी जेव्हापासून उठली तेव्हा पासून गावात अवैध दारूविक्री मुळे शांतता भंग झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.गावातीलच गावातीलच काही व्यक्ती हा अवैध दारूविक्री धंदा करीत असून सुखाने नांदणारे संसार आज घडीला उघड्यावर आले आहेत,याचा कमालीचा त्रास हा महिलांना सहन करावा लागत असल्याने गावातील अनेक बचत गटाचे ग्राम सेवा संघ व त्यामध्ये समाविष्ठ असलेली अनेक महिला बचत गटाच्या महिला,सरपंच,सदस्य एकत्र येत अवैध दारूविक्री बंद करण्याचा ठराव पारित करून आज दि.17रोजी पोलीस स्टेशन गोंडपीपरी येथे येऊन गावात चालणारी अवैध दारूविक्री बंद करण्यात यावी असे निवेदन गोंडपीपरी चे ठाणेदार राजगुरू यांना देण्यात आले.यात तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गणेश कोवे,पोलीस पाटील शारदा पिंपलकर सरपंच अंकुर मलेलवार ग्राम पंचायत सदस्य दर्शना दुर्गव,विलास लोणारे बेबी शेडमाके, दीपा ताजने,,यांचे सह शेकडो महिलांची उपस्तीती होती.
===================≠
कोड:-  विठ्ठलवाडा हे गाव अत्यंत शांतप्रिय असून वाढलेल्या अवैध दारू विक्रीमुळे लहान बालकापासून तर मोठ्या व्यक्ती पर्यंत दारूचा छंद जडलेला आहे त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत अशी तक्रार विठ्ठलवाडा येथील महिलांनी निवेदनाद्वारे केली असून यावर नक्कीच प्रतिबंध लावू अशी गवाही ठाणेदार जीवन राजगुरू यांनी दिली आहे
*ठाणेदार जीवन राजगुरू*

0/Post a Comment/Comments