कोंबड्या खाण्यासाठी आलेला बिबट अलगद पिंजऱ्यात अडकला


कोंबड्या खाण्यासाठी आलेला बिबट अलगद पिंजऱ्यात अडकला

 गडचिरोली वार्ता न्यूज


  भद्रावती शहरातील खापरी वार्ड येथील साई नगर येथे निरंजन रामचंद्र चक्रवर्ती यांच्या घरी असलेल्या पाळीव कोंबड्यांच्या खुराड्यात पहाटे साडे ४ वाजताच्या सुमारास अडीच वर्षीय बिबट्याने प्रवेश केल्याने तो अखेर तो तेथे अडकला.
      त्यामुळे त्या परिसरात चांगलीच खळबळ माजली.दरम्यान बिबट्याने खुराड्यात असलेल्या  काही कोंबड्यांना आपले भक्ष बनविले.   या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाची चमू,इको - प्रो ,सार्ड, आरआरआर व आरआरटी च्या चमूने दाखल होऊन सकाळी ५ ते साडे १० वाजेपावेते रेस्क्यु टीम ऑपरेशन राबऊन अखेर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले.
वैद्यकीय तपासणी करून त्यास भद्रावती वनपरिक्षेत्रातील जंगलात निसर्गमुक्त करण्यात आले.
       सदर बिबट हा अडीच वर्षीय असून त्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक वन संरक्षक निकिता चौरे, वनपरिक्षेत्र अधिकारी हरिदास शेंडे  इको-प्रोचे बंडू धोतरे व त्यांची चमू,सार्डचे अनुप येरणे व त्यांची चमू, आरआरआर व आरआरटी या टीमने रिस्क्यु  ऑपरेशन मोहीम राबऊन तब्बल साडे ५ तासानंतर अखेर बिबट्यास पिंजऱ्यात जेरबंद केले.  पशू वैद्यकीय अधिकारी यांच्या वैद्यकीय तपासणी अहवालानंतर बिबट्या निसर्गमुक्त करण्यात आले. यामध्ये रविकांत खोब्रागडे, भद्रावती वन परिक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक विकास शिंदे, बीट वनसंरक्षक धनराज गेडाम,वनरक्षक,वन कर्मचारी, वन मजूर सार्डचे इम्रान खान,अमोल कुचेकर,सोनू कूचेकर,प्रणय पतरांगे,पंकज कूचेकर, इको-प्रोचे संदिप जीवने, अमोल दौलतकर, दिपक कावठी आदींचे सहकार्य लाभले.

प्रतिनिधी शाम चटपल्लीवार
 ‌‌          भ‌द्रावती

0/Post a Comment/Comments