लाजेलाही लाज वाटेल... प्रा डॉ सुधीर अग्रवाल


लाजेलाही लाज वाटेल...

प्रा डॉ सुधीर अग्रवाल

आजच युग विज्ञान तंत्रज्ञांनाचं आहे.विज्ञान व तंत्रज्ञाच्या युगात आपण तंत्रस्नेही बनून अनेक क्षेत्रात उंच भरारी घेत असतांनाच काही असामाजिक तत्व मात्र या तंत्रज्ञांनाचा दुरुपयोग करत आहे,नव्हे तर लाजेलाही लाजवेल अशा प्रकारचे  अश्लाघ्य, दुष्कृत्य करत आहे.अश्लाघ्य,दुष्कर्म व दुष्कृत्य केवळ पुरुषांकडूनच होत आहे,असे नाही  तर यात महिला व मुली देखील आघाडीवर आहे. विद्यार्थी निंना  नागडे करून त्याचा  व्हिडीओ बनवण्यापर्यत मुली व विद्यार्थीनी  अग्रेसर असल्याचे दृश्य बघायला मिळत आहे.लाजेलाही लाजवेल अशा प्रकारचं कृत्य शिक्षण घेणारी विद्यार्थीनीने केला आहे.  चंदीगड विद्यापीठातील आक्षेपार्ह व्हिडीओ लिक प्रकरण सध्या गांजतय.

पंजाबच्या मोहालीतील  एका विद्यापीठात रात्री उशिरा परिस्थिती अनियंत्रित झाली होती. एका विद्यार्थिनीनं आंघोळ करताना इतर विद्यार्थिनींचा व्हिडिओ बनवला आणि तो इंटरनेटवर जोरदार व्हायरल झाला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर वसतिगृहातील मुलींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची बातमी देखील समोर आली.
मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीनं आंघोळ करताना ६० विद्यार्थिनींचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केलाय. ही विद्यार्थिनी हे व्हिडिओ एका मुलाला पाठवत होती आणि तो मुलगा ते व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करायचा. ही घटना ताजी असतानाच दुसरीकडे, आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थीनीचा आंघोळीचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली.

स्त्रियांचा,मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असताना एका विद्यार्थी कडून आपल्याचं कॉलेजमधील विद्यार्थीनिंचे नग्न व्हिडीओ बनवून आपल्या मित्राला पाठविण्याचा अश्लाघ्य प्रकार एका मुलीकडून झाल्याने  शाळा व कॉलेज मधील विद्यार्थीनी व देशातील महिला सुरक्षित राहतील काय.?

दिल्लीत झालेला गँगरेप, आसिफा रेप केस, डॉक्टर प्रियंका रेप केस असो कि काल परवाची हिंगणघाट येथील प्राध्यापिका जळीत प्रकरण असो. या सर्वांनी देशाला एक दाखवून दिले आहे कि भारतातील स्त्रिया सुरक्षित नाहीत. भारतीय महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्न काही केल्या सुटत नाही आहे, उलट ही स्थिती आटोक्यात येण्यासाठी खूप मोठा काळ अजून लागणार कि काय असंच झालं आहे. तस त्यांना माहिती आहे कि नाही हा सुध्दा एक मोठा प्रश्न आहे कि, अजून किती महिला, मुली व अल्पवयीन मुलिंचा गँगरेप  व अत्याचाय होईल ? हे न सांगता येणारं आहे.  डॉक्टर असलेली प्रियंका जेव्हा रात्री कामावरून परत येत होती तेव्हा तिच्यावर मदतीच्या नावावर रेप झाला आणि तिला जाळून टाकण्यात आले. ज्या काही देशात मुली सुरक्षित नाही त्या देशाच्या यादितला आपला एक महान भारत देश, जिथे संध्याकाळ होताच मुली घरातून बाहेर पडायला भीतात आणि त्यांच्या आईवडिलांना संध्याकाळ होताच जीवात धडधड व्हायला लागते. ज्या देशात राजधानीत,उपराजधानीतच भर रस्त्यात बलात्कार होतो आणि लोकं बघे बनत निघून जातात, हाच तो देश जिथे हैद्राबाद,मुंबई, दिल्लीसारख्या प्रगतिवान शहरात मुलीवर बलात्कार करून जिवंत जाळले जाते आणि बलात्कारी पुरावा नसल्या कारणाने कायद्याच्या सचोटीतून सुटून जातो आणि खुलेआम पुन्हा; पुन्हा एक बलात्कार करण्यासाठी मोकळा होतो. आम्ही पुन्हा एक हॅशटॅग लिहतो, क्यांडली जाळतो, श्रद्धांजली वाहतो आणि झालेली घटना विसरून, न्याय मिळो वा ना मिळो पुन्हा आपआपल्या वाटेला लागतो पुन्हा एका नव्या बलात्काराला तोंड देण्यासाठी.
 मला ही घटना वाचून पहिल्यांदा आपल्या सिस्टिमवर, सरकारवर आणि न्याय प्रणालीवर खूप राग आला पण मी काहीच करू शकत नाही याचा मला त्याच क्षणी अनुभव झाला. आपलेच चुकते आपण सर्व गोष्टी सरकावर लोटून देतो आणि मोकळे होतो कधी पोलिसांवर तर कधी दुसऱ्याला दोष देत. एकट्या सरकारन बदलून या सिस्टिम ला बदलून काहीच होणार नाही. आधी आपण स्वतः बदलायला हवे; बलात्काराला बघे म्हणून बघण्याआधी आणि आपल्या बरोबरच आपण बलात्कारी निर्माण करण्याऱ्या समाजाची मानसिकता बदलायला हवी. तुम्हाला काय वाटते कि बलात्कारी एका दिवसात पैदा होतो? कधीच नाही. बलात्कारी हा एका मोठ्या प्रक्रियेने जन्म घेत असतो आधी जवळच्या माणसावर कुदृष्टी टाकून, चुकीने चुकीच्या जागेवर स्पर्श करून. प्रत्येकदा आपणच त्यांना नजरअंदाज करत असतो आणि त्यामुळे त्यांना ती चूक करायला पुन्हा पुन्हा उत्तेजन मिळत असते. त्याच्या आत होणारा बदलावं त्याची आई, त्याची बहीण आणि सर्व समाज बघत असतो पण आपण प्रत्येक वेळी; मला करायचं या एकाच भावनेने लूटपुट झालेलो असतो. जाऊद्या सोडा बलात्कार तर रोजच होणार आहे जो पर्यन्त तुम्ही स्वतः एकएकाने येऊन बलात्कारी समाजाची परिस्थिती बदलवणार नाहीत तो पर्यन्त, जो पर्यन्त तुमचं लक्ष या गोष्टीकडे नसेल कि, पुढचा बलात्कारी माझ्या घरातून नको याकडे तो पर्यंत एक एक बलात्कारी जन्माला येतच राहणार आणि प्रत्येकवेळी एक निर्भया बळी जाणार.. कदाचित होऊ शकते ती तुमच्या घरातीलच असेल.लाजेलाही लाज वाटेल असं अश्लाघ्य प्रकार डोळ्यादेखत होत आहे.हे चित्र कधी बदलणार.?

९५६१५९४३०६

0/Post a Comment/Comments