बापरे......... दारू बंदी असतानाही दारूविक्रेत्यांनी घरात लपविला मोहफूल सडवा


बापरे.........

दारू बंदी असतानाही दारूविक्रेत्यांनी घरात लपविला मोहफूल सडवा


किशोर उसेंडी
गडचिरोली वार्ता न्यूज 

कोरची तालुक्यातील कोहका येथे दोन दारूविक्रेत्यांनी आपल्या घरी मोहफुलाच सडवा लपवून ठेवला होता. याबाबतची माहिती मिळताच महिलांनी त्याच्या घरावर छापा टाकून भेट देऊन दोघांकडील ८० लिटर मोहफुलाचा सडवा व दोन लिटर दारू जप्त करून नष्ट केली. सोबतच एका विक्रेत्याकडून पाच हजार दंडही वसूल केला.

कोहका गावात गेल्या काही वर्षांपूर्वी दारूविक्री बंद होती. मात्र, काही विक्रेत्यांनी चोरट्या मार्गाने विक्री करण्यास सुरू केली होती. गावातील दारूविक्री पुन्हा बंद करण्यासाठी गाव संघटनेच्या माध्यमातून सभेचे आयोजन करण्यात आले. यात गावात दारूविक्री करणाऱ्यांवर १० हजार रुपये दंड, विक्रेत्याची माहिती देणाऱ्यास बक्षीस, गावात दारू पिऊन भांडण करणाऱ्यांकडून पाच हजारांचा दंड वसूल करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. दरम्यान, माहिती मिळाल्यानंतर गावातील पाच दारूविक्रेत्यांच्या घरांची तपासणी केली असता, एका घरी ८० किलो मोहफुलाचा सडवा व एकाकडे दोन लिटर दारू आढळून आली. संपूर्ण मुद्देमाल नष्ट करून विक्रेत्यावर दंडात्मक कारवाई केली. तसेच पुन्हा दारूविक्री करताना निदर्शनास आल्यास संबंधित विक्रेत्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्याची तंबी दिली. यावेळी गाव संघटनेचे पदाधिकारी, तंमुस अध्यक्ष व गावकरी उपस्थित होते

0/Post a Comment/Comments