डॉ. रत्ना चौधरी यांचे "हिंदी उपन्यासों में समाज जीवन" पुस्तक पुणे येथे प्रकाशित. गडचिरोली वार्ता न्यूज


डॉ. रत्ना चौधरी यांचे "हिंदी उपन्यासों में समाज जीवन" पुस्तक पुणे येथे प्रकाशित.

गडचिरोली वार्ता न्यूज 

वर्धा, दि. 22: सामाजिक कार्यकर्त्या, आदर्श शिक्षिका आणि लेखिका डॉ.रत्ना चौधरी- नगरे लिखित "हिंदी उपन्यासों में समाज जीवन"  या संशोधन -समीक्षापर पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पुणे येथे  संपन्न झाले.

युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालय -भारत सरकार, नेहरू युवा केंद्र- पुणे, पृथा फाउंडेशन, एज्यूथान संस्था आणि पुणे महाविद्यालय- पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन पुणे महाविद्यालय येथील आय. क्यू. ए. सी. विभागाच्या सभागृहात संपन्न झाले. या पुस्तकाचे प्रकाशन हिंदी सल्लागार समिती-भारत सरकारचे सदस्य विरेन्द्र कुमार यादव व महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे, बालभारतीच्या विद्या शाखा समन्वयक व हिंदी विशेष अधिकारी डॉ. अलका पोतदार यांच्या हस्ते,हिंदी साहित्य सेवा संस्था प्रयागराज (उ.प्र) चे प्रदेशाध्यक्ष डॉ. शहाबुद्दिन शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.


पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे प्रास्तविक  डॉ अलका पोतदार यांनी केले. पुस्तकावर समीक्षापर भाष्य सब लेफ्टनंट डॉ. शाकीर शेख यांनी केले. डॉ. रत्ना चौधरी-नगरे यांनी आपली लेखकीय भूमिका मांडली. प्रकाशन सोहळ्याची भूमिका उप प्राचार्य प्रा. डॉ इम्तियाज आगा यांनी मांडली. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नेहरू युवा केंद्रा-महाराष्ट्राचे सह संचालक यशवंत मानखेडकर, पुणे कॉलजचे प्राचार्य डॉ. आफताब शेख, महाराष्ट्र राज्य जीवन शिक्षण मासिकाच्या सचिव- सदस्य डॉ किरण धांडे, उप प्राचार्य प्रा. मोईनुद्दिन खान उपस्थित मंचावर होते.

या शिवाय डॉ. रेणु सिंह (लखनऊ ), डॉ. प्रेरणा उबाळे, डॉ. निर्मला राजपूत, श्रीमती मीनाक्षी भालेराव, श्रीमती भावना गुप्ता, डॉ. रीना सुरडकर,डॉ. मिलींद बनकर, प्रा. किरण नगरे, डॉ शकिला मुल्ला, प्रा. दिपिका कटरे, प्रा.कांचन पाडळकर, सरबजीत किराड, प्रा. रुखसाना शेख, डॉ. सलीम मनियार, दयानंद कनकदंडे, लायन सुभाष गोयल , अरुण खिल्लारी, सुरेंद्र पोतदार, प्रा. रमजान वारुणकर,इ‌. प्रभृति प्रकाशन कार्यक्रमास विशेषशत्वाने या उपस्थित होते.

  ' हिंदी उपन्यासों मे समाजजीवन ' या
पुस्तकात लाला श्रीनिवास दास यांच्या 'परीक्षा गुरु', डॉ. राही मासूम रजा यांच्या 'टोपी शुक्ला', कमलेश्वर यांच्या 'समुद्र में खोया हुआ आदमी ',नसीरा शर्मा यांचे 'ठिकरे की मंगनी',  मेहरून्नीसा परवेज यांचे 'कोरजा', मंजूर एहतेशाम यांच्या 'मदरसा',चित्रा मुदगल लिखित 'आवां ' या कादंब-यातील सामाजिकतेचा आणि मानवी संबंधाचा प्रभावीपणे शोध घेण्यात आला आहे. हे पुस्तक इंटरनॅशनल पब्लिकेशन - कानपुर यांनी प्रकाशित केले आहे.
प्रकाशन सोहळ्याचे संचालन डॉ बाबा शेख यांनी तर आभार प्रदर्शन डॉ शाकीर शेख यांनी केले.

0/Post a Comment/Comments