धानोरा : राष्ट्रीय महामार्गावरील लेखा गावाजवळ दोन ट्रक फसल्याने वाहतुकीची कोंडी•


धानोरा : राष्ट्रीय
महामार्गावरील लेखा
गावाजवळ दोन ट्रक
फसल्याने वाहतुकीची कोंडी• 

वाहनाच्या लांबच लांब रांगा

अक्षय गोंगले 
गडचिरोली वार्ता न्यूज 
 


गडचिरोली / धानोरा  13 सप्टेंबर : गडचिरोली
धानोरा हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने या राष्ट्रीय महामार्गावर अनेक मोठे खड्डे पडलेले असूनही संबंधित विभाग कुंभकर्णाची झोप घेत असून त्यामुळेच येथील खड्डे दुर्लक्षित असल्याने याच खड्ड्यात मागील आठवड्यात दुचाकीचा तोल जावून अपघात घडला व त्यानंतर ट्रक फसला
तसेच काल 12 सप्टेंबर रोजी रात्रो दोन मोठी जडवाहक ट्रक एकाच ठिकाणी फसल्याने या महामार्गाची वाहतूक ठप्प झाली असुन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. यामुळे शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा बुडाली. त्यामुळे याला जबाबदार कोण ? असा संतप्त प्रश्न लोक विचारीत आहेत.

0/Post a Comment/Comments