ग्रामसेवक मुख्यालयी सापडेनात मुख्यालयी राहण्याची सक्ती करा परमेश्वर शेषराव गावळे गोंडवाना गोटुल सेनेचे जिल्हा सचिव यांनी निवेदनाद्वारे केली मागणी


ग्रामसेवक मुख्यालयी सापडेनात
मुख्यालयी राहण्याची सक्ती करा 

परमेश्वर शेषराव गावळे गोंडवाना गोटुल सेनेचे जिल्हा सचिव यांनी निवेदनाद्वारे केली मागणी 

राज सोनुले
गडचिरोली वार्ता न्यूज पोर्टल 


 ग्रामसेवक हा गाव आणि सरपंच यामधील विकासात्मक दुवा समजला जातो. धानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पेंढरी- गट्टा परिसरातील ग्रामपंचायतमधील काही ग्रामसेवक मुख्यालय राहत नसून  शहरामध्ये राहून ग्रामपंचायत नियुक्तीच्या ठिकाणी अपडाउन करतात त्यामुळे गावविकासाला खीळ बसत आहे.
धानोरा तालुक्यातील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे तालुक्याच्या ठिकाणी राहून अपडाउन करीत आहेत. धानोरा तालुक्यातील काही ग्रामपंचायतीचा कारभार आओ जाओ तुम्हारा घर असा झाला आहे. जिल्हा परिषदेमार्फत राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना जातात. कल्याणकारी शासन म्हणून या सेवा ग्रामीण भागातील जनतेला सर्व काळ उपलब्ध होतील असे शासनाकडून पाहिले जाते.
यासाठी जिल्हा परिषदेकडून नियुक्त केल्या जाणा-या ग्रामसेवकांना मुख्यालय राहणे बंधनकारक केले आहे. गाव पातळीवर ग्रामसेवकांना गावचा सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने मुख्यालय राहणे बंधनकारक असल्याचा ग्रामविकास विभागाने धोरणात्मक निर्णयही घेतला आहे.
मात्र सदर निर्णयाची पायमल्ली होताना दिसून येत आहे. याकडे वरिष्ठाकडून होत असलेला दुर्लक्षामुळे, असे होत असल्याचे दिसून येत आहे.
धानोरा तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी असणे अनिवार्य आहे .बरेचदा ग्रामसभा आणि मासिक सभेलादेखील ग्रामसेवक हजर राहत नाहीत.
गावातील कोणता वॉर्ड कोठे आहे? यांचीही माहिती त्यांच्याकडे नसते. गावात कोणत्या समस्या आहेत. कोणती कामे करायची आहेत, याची कल्पना देखील नसते, कारण गाव म्हटले की समस्याचा जणू पाढाच असतो.
या करीता पेंढरी - गट्टा परिसरातील ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्यात यावी अशी मागणी परमेश्वर शेषराव गावळे , गोंडवाना गोटुल सेनेचे जिल्हा सचिव यांनी निवेदनाद्वारे संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती धानोरा यांच्या कडे केली आहे.

0/Post a Comment/Comments