पोलीस भरतीत पाच टक्के गुण वाढवून दिल्याने विध्यार्थांचे नुकसान शासनाच्या ०२/०३/२०२२ च्या शासननिर्णयाने पोलीस भरती न घेण्याची मागणी


पोलीस भरतीत पाच टक्के गुण वाढवून दिल्याने विध्यार्थांचे नुकसान

शासनाच्या ०२/०३/२०२२ च्या शासननिर्णयाने पोलीस भरती न घेण्याची मागणी

गडचिरोली वार्ता न्यूज 
सिरोंचा:-( दि. १९)  दि.02/03/2022 रोजीच्या शासनाच्या जी.आर. प्रमाणे कोणत्याही प्रकारची पोलीस भरती घेऊ नये असे निवेदन सिरोंचा तालुक्यातील विध्यार्थी तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले आहे.  महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया चालू आहे व संपूर्ण राज्यामध्ये लाखो विद्यार्थी पोलीस भरती करिता तयारी करीत आहेत. काही विद्यार्थ्यांच्या असे निदर्शनास आले आहे की, जिल्हा गडचिरोली येथे पोलीस भरती प्रक्रिया दरम्यान दि.02/03/2022 च्या जी.आर. प्रमाणे प्रत्येक एन.सी.सी. च्या विद्यार्थ्याला एकूण गुणांच्या 5% गुण वाढवून देण्यात आले. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.
 एन.सी.सी विद्यार्थ्यांना एकूण जागेच्या 5% जागा राखीव ठेवणे न्याय्य व योग्य आहे. परंतु सध्या जी गुणांच्या 5% गुण वाढून देण्याची प्रक्रिया चुकीची व अन्याय कारक आहे म्हणून ती तात्काळ बंद करावी व दि.02/03/2022 अगोदरच्या नियमाप्रमाणे सर्व राज्यांमध्ये पोलीस भर्ती करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे या वेळी  विजय बॉंगोनी,राजबापू नुकूम,
राजेंद्र कतिरेऊला,चक्रवर्ती बॉंगोणी यांनी सिरोंचा तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस अधीक्षक गडचिरोली यांना निवेदन पाठविण्यात आले.

0/Post a Comment/Comments