मृतक करण यांच्या परिवाराला आर्थिक मदत


मृतक करण यांच्या परिवाराला आर्थिक मदत 

- नाडेकल जंगलात मेंढ्या राखणारा करण वीज पडून जागीच झाला होता ठार



अक्षय गोंगले 
गडचिरोली वार्ता न्यूज



गडचिरोली / कोरची : तालुका मुख्यालयापासुन अंदाजे 15 कि.मी. अंतरावर असलेल्या नाडेकल जंगलामध्ये, मेंढ्या राखण्यासाठी गेलेल्या करण सरजू पोरेटी याचा वीज पडून 31 ऑगष्ट ला जागीच मृत्यू झाला होता. कोरची तालुक्यातील ग्राम पंचायत दवंडी अंतर्गत येत असलेल्या आंबेखारी येथील 27 वर्षीय करण हा सरजू पोरेटी यांचा मोठा मुलगा व आपल्या घराची जबाबदारी सांभाळनारा मुलगा होता. करण याचे विवाह 2021 ला झाले होते व त्याच्या पश्चात त्याची पत्नी, आई, वडील व दोन लहान भाऊ असा आप्त परिवार असून घराची परिस्थिती हलाकीची व घरचा कर्ता गेला म्हणून त्याच्या परिवारातील सदस्यांची हातावर पोट अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
शुक्रवारी तहसील कार्यालय कोरची येथे नैसर्गिक आपत्ती मृत व्यक्ति सहाय्य योजना अंतर्गत चार लाख रूपयाचे चेक देण्यात आले सदर चेक नायब तहसीलदार गजभिये यांनी मृतक करण याच्या परिवाराच्या सदस्यांना दिले यावेळी
कुकडेल येथील पोलिस पाटील भारत नुरूटी, दिपक हलामी, मनुराम नुरूटी, सतवंतीन करण पोरेटी (पत्नी), गीताबाई पोरेटी (आई), सरजू पोरेटी (वडील) आदि उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments