चालकाला आली झोपेची डुलकी, उभ्या वाहनाला धडकली मुंडकी, डोक्याची उडाली कवटी

चालकाला आली झोपेची डुलकी,
उभ्या वाहनाला धडकली मुंडकी, डोक्याची उडाली कवटी

 *ट्रक चालक जागीच ठार*


gondpipri - ashti road accident track driver death 
 गोंडपिपरी - आष्टि मार्गावर विठ्ठलवाडा बस स्टँडजवळ झालेल्या भीषण अपघातात लगाम बोरी येथील ३५ वर्षीय ट्रक चालक ठार झाल्याची घटना आज बुधवारला रात्रौ 2 वाजताच्या सुमारास घडली आहे.
 चालकाला झोप लागल्यामुळे गाडी रस्त्याच्या बाजूला उतरली आणि उभ्या असलेल्या एका खाजगी हायवा ट्रकला जाऊन धडकली.चालकाचे डोके गाडीच्या बाहेर निघून असल्यामुळे डोक्याला जबर मार बसला त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. Track no. सदर ट्रक वाहनाचा क्रमांक एम एच ३३ टी १८८२ आहे.

 आर के ट्रेडर्स ट्रान्सपोर्ट गडचिरोलीच्या मालकीची असलेले ट्रक वाहन गडचीरोली जिल्हातून लाकडे भरून बल्लारपूरकडे येत असताना अचानक ट्रक चालकाला झोप लागल्याने रस्त्यावरील उभ्या वाहनाला ट्रक धडकली चालकाची डोक्यावरील कवटीच उडाली. त्यामुळे ट्रक चालक जागीच ठार झाल्याची घटना विठ्ठलवाडा बसस्थानका समोरील रस्त्यावर घडली आहे. Death track driver name 
मृतकाचे नाव अमिद शेख वय ३५ असे असून राजपुर बोरी ता.अहेरी येथील रहिवाशी होता. 
घटनेची माहिती गोंडपीपरी पोलीस स्टेशनला कळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले.मृतकाचे शव उत्तरणीय तपासणीसाठी गोंडपीपरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असून पुढील तपास गोंडपीपरी पोलिस करीत आहे.
Gondpipri police, gramin hospital

0/Post a Comment/Comments