गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील रेल्वेचे विविध रखडलेले प्रश्न व रेल्वेच्या विविध समस्या निकाली काढा.

गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील रेल्वेचे विविध रखडलेले प्रश्न व रेल्वेच्या विविध समस्या निकाली काढा.


दिल्ली येथील संसदीय रेल्वे बोर्ड च्या बैठकीमध्ये खा.अशोक नेते यांची मागणी.  


फुलचंद वाघाडे / जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.


गडचिरोली :- गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते यांनी दिल्ली येथे केंद्रीय संसदीय रेल्वे बोर्ड अंतर्गत झालेल्या बैठकीत रेल्वे संदर्भात काही महत्वाचे मुद्दे मांडून या बद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. व या मुद्द्यावर देशातील समस्त रेल्वे बोर्ड सदस्य खासदार व केंद्रीय अधिकारी उपस्थित होते . यामध्ये प्रामुख्याने देशातील समस्त रेल्वेत झालेली भाडेवाढ कमी करण्यात यावी? व गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील नवीन वडसा ब्राडगेज लाईनचे काम लवकरात लवकर त्वरित करण्यात यावा , समस्त रेल्वेची गोंदिया जिल्हा सालेकसा येथे , स्टापेजेस देण्यात यावा , तसेच एक्सप्रेस व सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचा स्टापेज आमगाव ,सालेकसा नागभिड, वडसा येथे देण्यात यावा तसेच येथे रेल्वेची 90% जमिन अधिग्रहण झाली व उर्वरित जमिन अधिग्रहण करुन तत्काळ करण्यात यावा या महत्वाच्या मुद्द्या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व सदर मुद्दे केंद्रीय संसदीय रेल्वे बोर्ड यांनी गांभीर्याने घेतले. व गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील सदर रेल्वेच्या समस्या दूर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे , सदर रेल्वे संबंधित समस्या दूर करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे खासदार अशोक नेते यांनी दिल्ली येथील बैठकी दरम्यान मनोगत व्यक्त केले.

0/Post a Comment/Comments