आलापल्ली वरुन सुरजागड लोहखनिज वाहतुकीची समस्या सुटणार

आलापल्ली वरुन सुरजागड लोहखनिज वाहतुकीची समस्या सुटणार

ऐलचिल - मुक्तापुर नविन मार्ग बनणार,

आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केले भुमिपुजन


राकेश तेलकुंटवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली


एटापल्ली - एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाळी वरुन आलापल्ली मार्गे लोहदगड वाहतुक सुरु आहे. या वाहतुकीमुळे नागरीकांना अनेक समस्याला तोड द्यावे लागत आहे, यावर तोडगा काढण्याकरीता एटापल्ली - आलापल्ली मार्गावरील ऐलचिल गावातुन नविन मार्ग बनणार आहे. दि. २५ ला. गुरुवारला दूपारला ४.३० वाजताच्या सुमारास या मार्गाचे भुमिपुजन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे हस्ते झाले.
हा मार्ग ऐलचिल वरुन वेलगुर मार्ग आलापल्ली - आष्टी मार्गावरील बोरी गावाजवळील दिनानदीजवळ मुक्तापुर गावातुन निघणार आहे. 
हा २६ कि.मी अंतराचा मार्ग आहे. या मार्गावरुन वाहतुक सुरु झाल्यानंतर ऐलचिल-आलापल्ली-नागेपल्ली-खमनचेरु या २७ कि.मी अंतरावरील लोहदगळ वाहतुकीचा मार्ग मोखळा होणार आहे. या करीता या मार्गाचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते उद्घघाटन करण्यात आले 
    यावेळी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी हा ४० वर्षापुर्वीचा जुना मार्ग आहे,या मार्गाला मूख्यमंत्री एकनाथ शिंन्दे, व उपमूख्यमंत्री व पालकमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी मजुरी दिली आहे.या मार्गाला केंद्राकरीता निधी मीळणार आहे, संध्या कंपनीने हा मार्ग पावसापुर्वी बनवावे असे सुचना दिले.
    यावेळी कंपणीचे मायनिंग व्यवस्थापाक साईकुमार, रस्ता व्यवस्थापक कमलकांन्त, ऐलचिलचे सरपंच किशोर आत्राम, बलराम सोमवानी, वसंतकुमार, डाॅ.छन्नी सलुजा, सुरेंन्द अलोने उपस्थीत होते.

0/Post a Comment/Comments