शासनाच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचवा --- आमदार डॉ. देवराव होळी

शासनाच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचवा --- आमदार डॉ. देवराव होळी  
                            

आष्टी येथे महास्वराज अभियान : १६ हजार दाखल्यांचे वाटप   
                           
भास्कर फरकडे प्रतिनिधी चामोर्शी / फुलचंद वाघाडे जिल्हा प्रतिनिधी..


आष्टी ( प्रतिनिधी ):- राज्य शासनाच्या योजनाचा लाभ गोरगरीब जनतेला मिळाला पाहिजे .विविध दाखले , प्रमाणपत्र काढण्यासाठी त्यांना पायपीट करावी लागणार नाही. यासाठी शासनाच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचवा असे निर्देश आमदार डॉ. देवराव होळी यांनी अधिकाऱ्यांना दिले.                
आष्टी येथील राजे धर्मराव हायस्कूल च्या पटांगणात आयोजित शासन आपल्या दारी तथा महास्वराज अभियान शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम , तहसीलदार संजय नागटिळक , संवर्ग विकास अधिकारी सागर पाटील , आष्टी च्या सरपंच बेबी बुरांडे , पोलीस निरीक्षक कुंदन गावडे , तालुका आरोग्य अधिकारी प्रफुल्ल हुलके वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत , संजय पंदिलवार , ठाकरी च्या सरपंच नंदा कुळसंगे , उपसरपंच विठ्ठल आचेवार , माजी जि.प.सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर , प्राचार्य शैलेंद्र खराती आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात लाभार्थ्यांना आमदार डॉ होळी यांचे हस्ते ट्रॅक्टर ची चावी , मुलींना सायकल वाटप , शेतकऱ्यांना अवजार वाटप करण्यात आले. या शिबिरात उत्पन्नाचा दाखला , रहिवासी प्रमाणपत्र , जातीचे दाखले , सिनिअर सिटीझन प्रमाणपत्र , नॉन क्रिमिलिअर , ३३ टक्के महिला आरक्षण प्रमाणपत्र ,आदी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या शिबिरात आरोग्य विभाग , वनविभाग , महावितरण कंपनी , महसूल विभाग , आदी विभागाचे स्टाल लावण्यात आले होते. या शिबिरात परिसरातील बऱ्याच गावातील नागरीक उपस्थित होते. तसेच आष्टी मंडळातील मंडळ अधिकारी , कर्मचारी व तलाठी उपस्थित होते. उपस्थितांना नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.

0/Post a Comment/Comments