कोरची तालुका आम आदमी पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन



*कोरची:- जितेंद्र सहारे*

             एक वर्षापासून थकीत पीएम किसान निधीचे शेतकऱ्यांचे पैसे अजूनही जमा झालेले नाही ते त्वरित जमा करावे यासाठी कोरची तालुक्यातील आम आदमी पक्षाच्या पदाधिकारीनी तहसीलदार गणेश सोनवाणी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना मंगळवारी निवेदन पाठवण्यात आले.
        निवेदनात तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांचे पीएम किसान निधीचे पैसे मागील वर्षापासून मिळालेले नाही. शेतकऱ्यांचे केवायसी आधार व मोबाईल लिंक बँकेसोबत असून संपूर्ण अटी पूर्ण करूनही पीएम किसान निधीचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन शेतकऱ्यांना त्वरित पी एम किसान निधी जमा करावी जमा न झाल्यास शेतकरीच्या आंदोलनाला आम आदमी पार्टीचा पाठिंबा राहणार असे निवेदनात म्हटले आहे.
         कोरची तहसीलदार गणेश सोनवाणे यांना निवेदन देताना आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धम्मदीप राऊत तालुका संघटन मंत्री हिरा भाऊ उईके, मुरकुटी शेतकरी चमारु मडावी, विजय दर्रो, जगेलंसिंग कचलामी, अमरु मडावी, मेहतर मडावी, सुंदर कुंभरे, दिनेश हिडको, दामेसाय दररो, नवलोबाई कमरो, रूपसाय तोफा, शांताराम पुढे तुळशीराम काटेंगे, प्रेमसाय पोरेटी, राजेश गोटा, रमेश वोरची, शिरजू कमरो, पुरुषोत्तम मडावी, वसीम कोरेटी, झाडूराम पोरेटी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments