*पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांनी ९ वर्षाच्या कार्यकाळात केलेली कामे घराघरात पोहोचवा*. *डॉ. उपेंद्रजी कोठेकर*

----------------------------------------
*काँग्रेसच्या साठ वर्षाच्या तुलनेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षातील केलेले कार्य विकास करणारे पर्व*...
*खासदार अशोक नेते*
----------------------------------------
दिं. ३० मे २०२३

गडचिरोली:-भारतीय जनता पार्टी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र
महाजनसंपर्क अभियान दिं. ३० मे ते ३० जून,या नियोजन कार्यक्रमांतर्गत गडचिरोली -चिमूर लोकसभा पदाधिकारी बैठक हॉटेल लॅन्डमार्क, चंद्रपूर रोड, गडचिरोली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.

 या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपा विदर्भ प्रांताचे संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी बोलतांना देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांचा ९ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असतांना ३० मे ते ३० जुन पर्यंतचे सर्व नियोजित कार्यक्रम गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्रातील संपूर्ण बूथ स्तरापर्यंत यशस्वी करण्यासाठी नियोजन करावे व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी ९ वर्षाच्या कार्यकाळात केलेले संपूर्ण कामे हे घराघरात पोचवून त्याचा प्रचार व प्रसार करावा असे आव्हान भाजपा विदर्भ प्रांत संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर यांनी केले.

या पदाधिकारी बैठकीचे समारोप करतांना खासदार अशोकजी नेते यांनी काँग्रेसच्या कार्यकाळात एकहाती सत्ता असतांना ६० वर्षातमध्ये जेवढा विकास केला नाही तेवढा विकास मा.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी ९ वर्षाच्या कार्यकाळात तीन पटीने सर्व क्षेत्रात विकास केलेला आहे.हे सर्व केलेले कार्य जनतेच्या घराघरांमध्ये पोहोचविण्याचे कार्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करावे व २१ दिवस महा जनसंपर्क अभियानाला मनाने, एकाग्रतेने काम करून भारतीय जनता पार्टीच्या यशस्वी वाटचालीकडे पदार्पण करावे. असे नव मोदी अभियान व महा जनसंपर्क अभियानाच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी केले.
 
या सभेच्या सुरुवातीला चंद्रपुर लोकसभा क्षेत्राचे खासदार स्व.बाळू भाऊ धानोरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

या बैठकीला प्रामुख्याने मार्गदर्शक संघटन मंत्री,भाजपा विदर्भ प्रांत मान.डॉ.उपेंद्रजी कोठेकर,खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते, जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवते, जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, माजी आमदार अतुलभाऊ देशकर,माजी आमदार भैरसिंगजी नागपुरे,माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर,लोकसभा संयोजक विरेंद्र अंजनकर,भाजपा जेष्ठ नेते प्रकाश सा. पोरेड्डीवार, जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार,प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चा चे प्रकाश गेडाम, चंद्रपूर जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे,जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे,जिल्हा महामंत्री गोविंद सारडा,जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे,तसेच मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments