स्वातंत्र्यवीर सावरकर साहस,त्याग व समर्पणाचे प्रेरणास्त्रोत* आ डॉ देवराव होळी


मारोती बारसागडे तालुका प्रतिनिधी



चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती कार्यक्रम संपन्न
देशासाठी एक नव्हे दोन काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे एकमेव स्वातंत्र्य सेनानी, देशासाठी स्वतःसह संपूर्ण परिवार देशासाठी समर्पित करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे साहस, त्याग, व समर्पणाचे प्रेरणास्त्रोत असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी चामोर्शी जनसंपर्क कार्यालयात आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती च्या निमित्ताने अभिवादन करताना केले.
यावेळी तालुक्याचे अध्यक्ष दिलीपजी चलाख, बंगाली जिल्हा आघाडी चे अध्यक्ष सुरेशजी शहा, तालुका महामंत्री साईनाथजी बुरांडे, जयरामजी चलाख, भोजराज भगत, प्रतीक राठी यांचे सह मान्यवर पदाधिकारी सावरकर प्रेमी व कार्यकर्ते उपस्थित होते.अनादी मी अनंत मी , अवघ्य मी भला मारील रिपू जगतिअसा कवन जन्मला
असे धिरोदत्त काव्य रचना करणारे 
ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला!
 अशी मातृभूमीच्या ओढीसाठी तळमळ असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वतःसह ,आपला मुलगा, पत्नी ,भाऊ, संपुर्ण परिवार या देशासाठी समर्पित केला. त्यांनी देशासाठी केलेला त्याग, त्यांचे समर्पण हा देश कधी विसरू शकणार नाही. त्यांचे कार्य, त्यांचा त्याग ,त्यांनी देशासाठी केलेली तपश्चर्या हे देशातील नवतरुण, युवक व देशभक्त नागरिकांसाठी प्रेरणास्त्रोत आहे असे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी यावेळी केले.

0/Post a Comment/Comments