देवरावजी होळी यांच्या उपस्थितीत दुर्गापूर येथील उपसरपंचासह कार्यकर्तांचा भाजपात प्रवेश




आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी भाजपचा दुपट्टा गळ्यात टाकून केले स्वागत.

दिनांक ३ जून २०२३ गडचिरोली

चामोर्शी सविस्तर

भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा ,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, जिल्ह्याचे नेतृत्व किसन नागदेवे व आमदार डॉक्टर देवराव होळी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तालुक्यातील दुर्गापूर येथील उपसरपंच सुरज सुधान्य मंडल यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी भाजपाचा दुपट्टा गळ्यात टाकून दुर्गापुरचे उपसरपंच सुरज सुधान्य मंडल, अशिन विजय मंडल रवींद्रपूर, सुरज सपन मंडल यांचे भाजपात स्वागत केले.

यावेळी उपास्थित भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शाह, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे,विनोद गौरकर,विष्णु ढाली,कलिपद मंडल,अरुन बेझींकवार, यांचे सह पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते

0/Post a Comment/Comments