मका खरेदीचे उद्दिष्ट वाढवा* *आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना मका उत्पादक शेतकऱ्यांचे निवेदन

*मका खरेदीचे उद्दिष्ट वाढवा*

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना मका उत्पादक शेतकऱ्यांचे निवेदन 

*आष्टी व घोट परिसरातील मका खरेदी टीडीसी मार्फत करण्यात यावी*

 *शासन स्तरावर पाठपुरावा करून मका खरेदीचे उद्दिष्ट वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे निवेदकाना आश्वासन*

*दिनांक १ जून २०२३ चामोर्शी*

*गडचिरोली जिल्ह्यामध्ये मका खरेदी उत्पादक यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून त्या मानाने खरेदीचे उद्दिष्ट कमी पडत आहे. त्यामुळे मका खरेदीचे उद्दिष्ट वाढवण्याची आवश्यकता असून शासनाने गडचिरोली जिल्ह्यासाठी खास बाब म्हणून मका खरेदीचे उद्दिष्ट वाढवावे अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्यामार्फत मका उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.*

*यावेळी निवेदन देताना मका उत्पादक शेतकरी अनुप बिस्वास, जगन्नाथ बिस्वास, सपन वाढाई, देविदास मंडल, सत्तुजित मंडल, अशोक मिस्त्री, अतुल मिस्त्री, विश्वजित मिस्त्री, पवित्रा बाला, दुर्जय सरकार, यांचे सह उपस्थित बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा*

*यावेळी आपल्या निवेदनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आष्टी व घोट परिसरातील मका खरेदी आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात यावी जेणेकरून शेतकऱ्यांना ते सोयीचे होईल व या परिसरात असणारी मकाखरेदी उत्पादक शेतकऱ्यांची बहुसंख्या लक्षात घेता या ठिकाणी तातडीने मका खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्यात यावे अशी मागणी केली.* 
*याबाबत आपण तातडीने शासन स्तरावर पाठपुरावा करून मका खरेदीचे उद्दिष्ट वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन आमदार डॉ देवरावजी होळी यांनी निवेदकांना दिले.*

0/Post a Comment/Comments