नांदेड जिल्ह्यातील बोढार गावातील अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी






रोहन कळसकर
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर




नांदेड जिल्ह्यातील बोढार या गावात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्या च्या कारणावरून काही जातीयवादी मानसिकतेच्या समुहाणी अक्षय भालेराव या तरुण युवकाची निर्घृण खुन करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी सर्व  जातीयवादी व हल्लेखोर आरोपींन वर भारतीय संविधानाच्या कायद्यानुसार कारवाई करुन त्यांना फाशी देण्यात यावे. या मागणी करीता भिम आर्मी बल्लारपूर व बल्लारपूर शहरातील समस्त आंबेडकर जनतेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांना बल्लारपूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आले या वेळी मागणी करीता बल्लारपूर शहरातील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते ॲड. मेघाताई भाले, भिम आर्मी बल्लारपूर चे शहराध्यक्ष शशिकांत निरांजने,तालुका अध्यक्ष बबलू करमरकर, अमर धोंगडे, अजित पडवेकर,रोहन कळसकर, सुमित (गोलू) डोहणे,सैफ अली खान, शुभम जगताप, प्रशांत झामरे,बादल ताकसांडे, विलाश तिरपुडे, सिध्दार्थ थोरात, प्रविण उमरे, अजय चव्हाण, रोहीत मेश्राममेश्राम, दिपक पडवेकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

0/Post a Comment/Comments