शिवनी येथे मान.खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते गोटुल भवनाच्या बांधकामाचे भुमिपुजन सोहळा संपन्न




*दि.०८ जुन २०२३*
गडचिरोली:- मान.खासदार श्री. अशोकजी नेते यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत ग्रामीण भागात सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विकास महत्त्वाचे असते या दृष्टिकोनातून आज शिवनी ता.जि.गडचिरोली येथे गोटुल भवनाच्या बांधकामाचे भूमिपूजन खासदार अशोकजी नेते यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करत बिरसा मुंडा अमर रहे, अमर रहे, जय सेवा जय पेरसापेन,भारत माता की जय या जय घोषाने उद्बोधन करत खासदार श्री. अशोकजी नेते यांच्या हस्ते कुदड मारून भुमिपुजन सोहळा पार पडला.
यावेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते,प्रदेश सरचिटणीस एस.टि.मोर्चा चे प्रकाश गेडाम, भाजपाचे कार्यकर्ते दत्तू माकोडे,माजी सरपंच वसंत गावतुरे,माजी सरपंच शिलाबाई कन्नाके,राकेश राचमलवार गोटूल समितीचे सदस्यगण, गिरीधर जुमनाके, वसंत रायशिडाम, श्रीहरि जुमनाके, ईश्वर जुमनाके, प्रकाश कन्नाके, बाबुराव रायशिडाम, कमल शिडाम,रवींद्र जुमनाके तसेच मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments