*तुकूम तलावातील अतिक्रमण काढा शेतकऱ्यांची मागणी*




देसाईगंज (वार्ता) :-

       स्थानिक तुकुम वार्ड येथील तलावात शेती करण्याच्या बहाण्याने काही लोकांनी अतिक्रमण करून तलाव गिळंकृत करण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्यामुळे तलावातील पाण्याचे स्त्रोत कमी होऊन जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला असल्याने तुकूम तलावातील संपूर्ण अतिक्रमण काढून तलाव पुर्वीप्रमाणेच मोकळा करण्यात यावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी मुख्याधिकारी डॉ. कुलभूषण रामटेके व न.प. चे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी जे. पी. लोंढे यांना निवेदनातून केलेली आहे.
          शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले की, देसाईगंज नगर परिषद क्षेत्रातील तुकुम वार्ड येथे भले मोठे तलाव आहे. या तलावामुळे नजिकच्या शेतकऱ्यांना सिंचनाई सोय उपलब्ध होते. मात्र काही लोकांनी तलावात अतिक्रमण करून त्यात शेती काढून उत्पन्न घेत आहेत. एकमेकांचे अतिक्रमण पाहून हळूहळू येथे मोठया प्रमाणात अतिक्रमण करण्यास सुरूवात झालेली आहे. त्यामुळे येथे निम्मी जागाच तलावाकरीता राहतल्याची दिसून येत आहे. त्यामुळे तलावात चारा व पाण्याची सोय उपलब्ध राहत असल्याने मुक्या जनावारांना सोईस्कर होत होते. परंतु वाढल्या अतिक्रमणामुळे येथे तलावाची जागाच कमी प्रमाणात दिसत असल्याने तसेच अनेकांनी येथे शेती काढण्याकरीता अतिक्रमण केलेले असल्याने तलावाच्या पाण्याने ओलाव्यामुळे जवळ जनावरांकरीता चारा, गवत पाहिजे त्या प्रमाणात राहिला नाही. ज्यामुळे मुक्या जनावरांना चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊन जनावरांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.
              भगतसिंग, आंबेडकर, माता, तुकुम वार्डातील शेतकरी आपली दुधाळ जनावरे गाय, म्हैस, बैल आदी तुकुम येथील तलावात पिण्याच्या पाण्याची सोय असल्याने व तलाव परिसरात जनावरांकरीता चारा उपलब्ध राहत असल्याने तुकुम तलावात आपली जनावरे घेऊन जातात. परंतु तलावातील वाढत्या अतिक्रमणामुळे तलावात जनावरांकरीता चाऱ्याच उपलब्ध राहीला नाही, तर काही ठिकाणी चारा उपलब्ध आहे मात्र अतिक्रमण धारकांनी आप-आपली शेती काढून तसेच पांदन रस्ता सुद्धा गिळंकृत केल्याने जनावरांना पुढे नेण्यास मोठी अडचण निर्माण होते. काहींनी अतिक्रमणीत जागेवर धान लावले असल्याने जनावरांना धानातून नेऊ शकत नाही अश्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावत आहे.
            त्यामुळे मुक्या जनावरांना चारा उपलब्ध होत नसल्याने तुक्म तलावातील संपूर्ण अतिक्रमण काढून तलाव पूर्वीप्रमाणेच अतिक्रमण मुक्त करावा, जेणे करून मुक्या जनावरांना योग्य चारा उपलब्ध होईल व यामुळे खरे पात्र शेतकऱ्यांना अतिक्रमण धारकांमुळे होत असलेल्या बासा पासून मुक्तता मिळेल. तसेच तुकूम तलावातील अतिक्रमण काढून मुक्या जनावरांना न्याय द्यावा अशी मागणी वजा विनंती परिसरातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे.
        निवेदन देताना माजी नगरसेवक रामकृष्ण मैद, सामाजिक कार्यकर्ते चैतनदास विधाते, संजय मोरे, शुभम शिलार, जगदिश धोटे, अरुण देशमुख, हिरालाल डेंगरी, रमेश कामडी, विजय देशमुख, रूपेश सुखदेवे, सह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments