*सुरक्षा रक्षकाने मिळवून दिली हरवलेली पर्स*



*पर्स मधील रोख रक्कम व दागिने महिलेला केले सुपूर्त*



यवतमाळ:- श्री.वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय येथे रुग्णांच्या नातेवाईकांची हरवलेली दागिन्याची व पैशाची बॅग(पर्स) अवघ्या काही तासातच दागिने व रोख रकमेसह सीसीटीव्हीच्या आधाराने सुरक्षारक्षक यांच्या सतर्कतेने ही पर्स मूळ मालक वनिता वरणे या महिलेला सुपूर्द करण्यात आले. सविस्तर माहिती अशी की दि.४जून रोजी सुरक्षारक्षक जयपाल चव्हाण स्वप्निल मुदळकर अनिल कांबळे हे कर्तव्यावर असताना एक महिला वनिता करणे रा. पिंपरी ही रडत आली असता घडलेली आप भीती तिने सुरक्षारक्षकांना सांगितली त्यानुसार क्षणाचाही विलंब न करता सुरक्षारक्षकांनी त्या महिलेच्या पर्स माहिती घेण्यास सुरुवात केली.
महिला नामे वनिता पंजाब वरणे हिची पर्स रुग्णालय परिसरात हरवले असता महिलेनी महाराष्ट्र सुरक्षा बल च्या सुरक्षा रक्षक जयपाल चव्हाण यांना माहिती दिली सुरक्षा रक्षकाने तात्काळ आपल्या सहकारी सुरक्षा रक्षक स्वप्नील मुदळकर, अनिल कांबळे,राजेश आडे,अंकुश शिंदे,व शोयेब आली यांना सोबत घेऊन परिसरात सुरु असलेल्या सी.सी टीव्ही कॅमरे मध्ये तपसनी केली तपासनी केली असता संशयित दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता वार्ड क्र १८ मधील महिलेला पर्स सापडली असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीवरून सुरक्षा रक्षकांनी वार्ड क्र १८ मध्ये तपास घेतला तपासामध्ये पर्स सापडलेल्या महिलेचा मुलगा भरती होता. विना गोपाल पोचारे असे पर्स सापडलेल्या महिलेचे नावं आहे. भरती असलेल्या मुलाला विचारल्यास ती महिला घरी जेवणाचा डब्बा घेण्या करीता गेली असल्याची माहिती दिली. सदर महिलेला फोन वरून संम्पर्क केला. महिलेला पर्स बद्दल विचारणा केली असता महिलेनी पर्स असल्याचे सांगितले व पर्स घेऊन परत येत असल्याची महिलेनी माहिती दिली महिला परत आल्यावर सुरक्षा रक्षकांनी पर्स मधील सर्व सामग्रीची तपसनी करून शासकीय रुग्णालयातील पोलीस चौकी या ठिकाणी पर्स मूळ मालक महिलेच्या स्वाधीन केली.

0/Post a Comment/Comments