अन् जावईच निघाला चोर....





शाम चटपल्लीवार / भद्रावती

भद्रावती:- आजच्या काळात जावयाला खूप मान आहे. जावई घरी आला की त्याचे स्वागत,मानदान मोठ्या उत्साहाने केले जाते.परंतु हाच जावई चोर निघाला तर….
घटना अशी की, भद्रावती तालुक्यातील माजरी येथील आंबेडकर वार्डातील रहिवासी विदीषा सुखराज रामटेके ही ६१ वर्षीय महिला गावाला गेली असता अज्ञात चोराने तिच्या घरातील सोने व चांदीचे दागिने चोरुन नेले. ती गावावरुन परत घरी आली असता घरातील दागिने चोरीला गेल्याचे तिच्या लक्षात आले. तीने लगेच पोलिस स्टेशन गाठून चोरीची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिस नायक हवालदार प्रदीप पाटील व पोलिस शिपाई सूरज हे लगेच घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी केली असता घरातील चोरी ही ओळखीतीलच कोणत्यातरी व्यक्तीने केली आहे असा पोलिसांना संशय आला.त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून अधिक चौकशी केली असता दि.२६ मे रोजी विदिषाच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा जाव ई विशाल शुक्राचार्य वनकर(३५) हा येऊन गेल्याचे समजले. त्याला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याचे वर्तन संशयास्पद वाटले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली व त्याच्याकडे असलेले ३८० ग्रॅम चांदी व २ ग्रॅम सोने पोलिसांकडे सुपूर्द केले. त्यानंतर ते दागिने पोलिसांनी तक्रारदार महिला विदिषा रामटेके यांना परत केले.
सदर कारवाई ठाणेदार अजितसिंग देवरे, पोलिस नायक हवालदार प्रदीप पाटील, हरिदास चोपणे, पोलिस शिपाई सूरज अवताडे यांनी पार पाडली

0/Post a Comment/Comments