दारू वाहतूक करणारी कार पकडली ; देसाईगंज पोलिसांची कारवाई





देसाईगंज : गोपनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीवरून पोलिसांनी शहरातील तुकुम वार्डातील मटण मार्केटजवळ सापळा रचून कार ताब्यात घेतली. कारमधून २ लाख ६० हजार रुपयांची दारू जप्त केली आहे. ही कारवाई २ जूनच्या रात्री करण्यात आली.

मोटवानी प्राथमिक निवासी शाळाकडून मटण मार्केटकडे येणाऱ्या रोडजवळ एक चारचाकी वाहन संशयितरीत्या येताना दिसले. त्याला थांबण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन थांबविले. गाडीमध्ये पुढील सीटवर ड्रायव्हरच्या बाजूला दोन इसम बसले होते, ते गाडी थांबताच गाडीतून उतरून पळाले. ड्रायव्हरला ताब्यात घेतले. चालकाचे नाव संकेत
राजू कावळे वय २८ वर्ष, रा. विर्शीवार्ड असे आहे. एम. एच. ४६ पी २३९३ क्रमांकाच्या कारची पाहणी केली असता, त्यात २ लाख ६६ हजार ६०० रुपयांची दारू आढळून आली. चार लाख रुपये किमतीची कारही जप्त करण्यात आली आहे. संकेत राजू 
कावळे वय २८ वर्षे, रा. विशवार्ड, आबेज साजिद शेख, अमन अलोणे, निर्मलसिंग प्रेमसिंग मक्कड, वय ४५ वर्षे, रा. गांधीवार्ड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक सुजाता भोपळे हे तपास करीत आहेत

0/Post a Comment/Comments