गरोदर मातेला अचानक शेतातच प्रसूतीकडा सुरू



प्रवास काटे.. वरचा वाचला जीव दोघांचंही...

कमाल त्या आरोग्यासेविकेचा तत्परतेचं टळला धोका


*आलापल्ली* शेतात एका गरोदर महिलेला अचानक प्रसूतीकळा सुरू झाल्या. शेतात रुग्णवाहिका जाऊ शकत नाही, गरोदर महिला दुचाकीवर बसण्याच्या परिस्थितीत नाही आणि मातेला प्रसूतीच्या वेदना. एवढेच नव्हे तर प्रसूतीसाठी गरोदर महिलेला रुग्णालयात न नेल्यास जीवाला धोका. अशा कठीण परिस्थितीत एका कंत्राटी आरोग्यसेविकेने तत्परता दाखवत तिला खाटेवर घेऊन तब्बल एक ते दीड किमीची पायपीट करत तत्काळ प्रसूती करून गरोदर माता आणि तिचे बाळ दोघांचेही जीव धोक्यातून बाहेर काढल्याची सुखद | घटना भामरागड तालुक्यातील ताडगाव येथे १४ जुलै रोजी घडली.

राजे अजय गावडे (वय २२) ही मूळची अहेरी तालुक्यातील पेरमिलीजवळील चिन्ना कोरली येथील रहिवासी असून ती ताडगाव येथे आपल्या माहेरी आली होती. शेतात काम करत असतानाच तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या. ती कशीबशी शेतातच असलेल्या आपल्या घरापर्यंत पोहोचली. याची माहिती ताडगाव | येथे कार्यरत असलेल्या कंत्राटी आरोग्यसेविका सपना भुरसे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ गावाबाहेर जंगलात असलेल्या शेतात जाऊन तिची आरोग्य तपासणी केली असता बाळाचे डोके प्रसूतीसाठी

फिक्स झाल्याचे आढळले. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते, अन्यथा बाळ आणि महिलेचा जीव धोक्यात येणार होता. मात्र, ती दुचाकीवर बसण्याच्या स्थितीत नव्हती. शेतातून दुचाकी चालवणेही कठीण होते. रुग्णवाहिका जाणे शक्य नव्हते. मात्र, माता आणि बाळाला वाचविण्यासाठी कंत्राटी आरोग्य सेविकेने शक्कल लढवत शर्तीचे प्रयत्न करत तत्परता दाखवली. कठीण परिस्थितीत आरोग्यसेविकेने शक्कल लढवत गरोदर महिलेला खाटेवर टाकून तब्बल एक ते दीड किलोमीटर पायपीट करून तिने प्राथमिक आरोग्य पथक गाठले. येथील

खाटेवर टाकून पायपीट करत गाठला दवाखाना

» विशेष म्हणजे, ती दोन दिवस अगोदर त्याच आरोग्य पथक येथे प्रकृती ठीक नसल्याने उपचारासाठी गेली होती. तिच्या तोंडात फोड झाल्याने तिच्यावर उपचार करून प्रसूतीसाठी दाखल होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले होते. मात्र, ती प्रसूतीसाठी आपल्या गावाकडे जाणार असल्याचे सांगितले होते. कदाचित ती अगोदरच आरोग्य पथकात दाखल झाली असती तर तिला एवढे हाल अपेष्ठा सहन करावे लागल्या नसत्या. गरोदरपणात ती आपल्या माहेरी शेतात काम करत होती. अशावेळी तिला आणि तिच्या बाळाला धोका निर्माण झाला असता, एका कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे तिची सुखरूप प्रसूती झाली.

सातमवाड यांनी तसेच त्यांच्या चमूने गरोदर मातेची सुखरूप प्रसुती केली. माता आणि नवजात मुलगी दोघेही सुखरूप असून त्यांना घरी सोडल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एम. येथील कर्मचाऱ्यांनी दिली.

0/Post a Comment/Comments