राज्य नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन गडचिरोली तर्फे स्वराज्य फाउंडेशन आलापल्ली यांना देण्यात आलेल्या बचाव कार्य साहित्यांच्या सहाय्याने मोदुमडगु व नागेपल्ली येथील पूरग्रस्तांना मिळाले वेळीच मदत



दि २८जुलै शुक्रवार:-
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार २७ व २८ तारीख हे रेड अलर्ट होते व हे हवामान खात्याचे अंदाज अचूक निघाले
पहाटे पाच वाजेपासून आलापल्ली परीसरातील संपूर्ण भागात वादडी वाऱ्यासह विजेचा कडकडाट जोराचा पाऊस झाला सतत चार ते पाच तास एकसारखा होत असलेल्या जोराच्या पावसामुळे आलापल्ली जवळील मोदुमडगु येथील काही भागात अचानकपणे पाणी शिरले याचेच परिणाम संपूर्ण भागात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होते तर काही कुटुंबाचे घर बुडाले तर काही घरात पाणी शिरले पुरपीडीत मदतीच्या प्रतीक्षेत होते अशयातच घटनेची माहिती स्वराज्य फाउंडेशनला मिडाली माहीती मिडताच स्वराज्य फाउंडेशनची संपूर्ण टीम क्षणाचा पण विलंब नकरता राज्य नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन गडचिरोली तर्फे देण्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती बचाव कार्य साहित्य घेऊन मोदुमडगु येथील पूरग्रस्तांच्या मदतीला आले त्या वेळेस तिथली परिस्थिती अत्यंत भयावह होती पाऊसाचे संततधार सुरूच होते एकीकडे विजेचा कडकडाट सुरू होता अश्यातच काही काही घर पूर्णपणे बुडेल अशी परिस्थिती दिसत होती.
मुख्य रस्त्यापासून त्या घरांपर्यत पोहचणे शक्य नव्हते माणूस सहज बुडेल इतका पाणी मधे साचला होता ही परिस्थिती लक्षात घेऊन स्वराज्य फाउंडेशचे टीम आपल्या जीवाची पर्वा न करता लाईफ जॅकेट,लाईफ बाय व नायलन रोपच्या साहाय्याने अडकलेल्या दोन परिवारातील सहा लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले व त्यांचे आवश्यक साहित्य आणी मुखे जनावरांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले.
पूरग्रस्तांनसाठी देवदूत ठरलेल्या स्वराज्य फाउंडेशनचे स्थानिक पुरपीडीतानी आभार मानले.

0/Post a Comment/Comments