आरमोरी इंदिरानगरातील नागरिकांना भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजमाप करून आखीव पत्रिका तात्काळ देण्यात यावे अन्यथा उपोषण



 तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक मिलिंद खोब्रागडे व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात राज्यांचे मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदनातून इशारा दिला आहे.

आरमोरी - नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्र.८ इंदिरानगर (बडी) जुन्या कोटासमोरील रहिवाश्यांना गावठाण अंतर्गत भूमिहारी हक्कावर घर बांधून निवासी प्रयोजनार्थ प्रत्येकी 30 बाय 30 चौरस फुट जागा प्रतिकुटुंब उपलब्ध करून दिली होती. त्याचे १९४२ ला अविभागिय अधिकारी गडचिरोली यांच्या सहीने प्रमाणपत्र वाटप झालेले होते. आरमोरी येथील नगर भूमापनचे सन १९४३-७४ मध्ये करण्यात आलेले असून इंदिरानगर (बडी) हा भाग त्यावेळी नगर भूमापन हद्दीत समाविष्ट करण्यात आलेला आहे या जागेत मागील ४० ते ५० वर्षापासून वास्तव्य असून ४४ वर्षापासून वादाचा भरणा अगोदर ग्रामपंचायत वसूल करीत होती. सद्यास्थितीत नगरपरिषद १०० टक्के कर वसुली करीत आहे.

सदर जागेवर विदयुत पुरवठा, सिमेंट रोड, संपूर्ण नाली बांधकाम, पिण्याच्या पाणीची व्यवस्था, सार्वजनिक वाचनालय, अंगणवाडी या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. सहा नागरिकांना घरकुल मंजूर झाले. वर्तमान स्थितीत पुन्हा ३०-३५ घरकुल पुन्हा मजूर होण्याच्या मार्गावर जाहेत. पण आता त्यांना आखीव पत्रकेची मागणी नगरपरिषदेकडून केल्या जात आहे. घरकुल गावठाण प्रमाणपत्रावर मंजूर झाले. आणि नव्याने प्रतीक्षेत असलेल्या घरकुलाना आखीव पत्रिकेची अट लादण्यात आली. तरीपण शासनाने नागरिकांची अडचन लक्षात घेता आखीव पत्रिका इंदिरानगर बर्डीचे ड्रोन सर्वेक्षण करून आखीव पत्रिका देण्यांत यावे. अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक मिलिंद खोब्रागडे व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात राज्याचे केबिनेट मत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या कडे निवेदनातून दिला आहे.
यावेळी शालिक पत्रे, दिवाकर पोटफोडे, अनिल किरमे,स्वप्नील ताडाम, पूजा गेडाम,करीना गेडाम,लता भोयर,शेवंता गराडे,आशा मेश्राम,पल्लवी मानकर इत्यादी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments