गोंडपिपरी येथील शेषराव महाराज दारु व्यसनमुक्ती भवनात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा



गणपती गुरुजींनी उपस्थितांना केले मोलाचे मार्गदर्शन


गोंडपिपरी: (दिनांक ३ जुलै) (गडचिरोली वार्ता न्युज): आज गुरुपौर्णिमा. गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणारा आजचा दिवस. आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला 'गुरुपौर्णिमा' साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीत गुरुला देवासमान मानले जात असून प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे अढळ स्थान असते. म्हणूनच या महत्त्वपूर्ण दिवशी गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. गुरुपौर्णिमेला गुरुपूजन केले जाते. गुरुंना वंदन करुन आशीर्वाद घेतला जातो. भारतातील अनेक मंदिरांसह विद्यादालनात गुरुपौर्णिमेचा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. व्यासांना भारतीय संस्कृतीमध्ये आद्यगुरु समजले जाते. आषाढ शुद्ध पौर्णिमेला व्यासांची जयंती असेत त्यामुळे या पौर्णिमेला 'व्यास पौर्णिमा' देखील म्हटले जाते.


भारतात पूराण काळापासून गुरु-शिष्य परंपरा आहे. ज्ञानसंपादनासाठी शिष्याला गुरुंच्या आश्रमात जावून राहावे लागत असे. ज्ञानप्राप्तीनंतर गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जात असे. कालांतराने गुरुकुल परंपरा लय पावली असली तरी गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत कायम आहे. त्यामुळे आजही गुरु पौर्णिमेनिमित्त शिष्य आपल्या गुरुंची भेट घेतात. आयुष्यातील गुरुंचे महत्त्व लक्षात घेऊन संतासह सामान्यांनी अभंग, ओव्या, कविता, लेखन याद्वारे गुरुंबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 


याच गुरुपौर्णिमा निमित्ताने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यासाठी गोंडपिपरी येथील शेषराव महाराज दारु व्यसनमुक्ती भवनात आज मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना गोंडपिपरी अध्यक्ष गणपती गुरुजींनी उपस्थित शिवभक्तांना गुरु म्हणजे काय याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी चरणदास भोयर, भास्कर फरकडे, समाजी पा.बोरकुटे, प्रविण नेवारे, प्रभाकर आऊलवार, बंडू पा. चुधरी यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील व तेलंगणा राज्यातील व चंद्रपूर जिल्ह्यातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

0/Post a Comment/Comments