श्रीमती वत्सलाबाई वनमाळी स्कुल ऑफ स्कॉलरचे स्काॅलरशिप परिक्षेत सुयश



👉आरमोरी-
मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ आरमोरी द्वारा संचालित श्रीमती वत्सलाबाई वनमाळी स्कुल ऑफ स्कॉलर येथील विद्यार्थ्यांनी प्राविण्य पटकावले.
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे 2022-23 यांच्या वतीने आयोजित केलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता आठवीतील विद्यार्थी आर्य लांजेवार,क्रिष्णा जुआरे, दिव्यांशी मरस्कोल्हे, क्रिष्णम्माकल्याणी राउत सदर विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र झाले असून त्यांनी शहरी सर्वसाधारण गटातून शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे.
विद्यार्थ्यानी यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक श्री नितीनजी कासार सर ,आईवडील, शिक्षक यांना दिले आहे.
या प्रसंगी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक मा. नितीनजी कासार तसेच पर्यवेक्षक किरणजी मांडवकर उपस्थित होते.स्काॅलरशिप परिक्षेविषयी रविकांत म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन गुलनाझ शेख तर आभार शिवांगी राऊत यांनी मानले. कार्यक्रमच्या यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले. राष्ट्रवंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

0/Post a Comment/Comments