हजारो शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील इस्लामपूरात 9 ऑगस्ट रोजी होणार सन्माननीय के. चंद्रशेखर राव साहेब यांचा सन्मान



शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांची माहिती

सन २०१३ साली तेलंगणा राज्याची निर्मीती झाली. इतर राज्याप्रमाणे तेलंगणा राज्यातही शेतकरी आत्महत्या सुरू होत्या. शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून के. चंद्रशेखर राव यांनी धोरण राबवायला सुरूवात केली. सर्व प्रथम त्यांनी शेतीला पाणी देण्याचा निर्णय केला. आशिया खंडातील सर्वात मोठी उपसासिंचन योजना राबविली. शेतीला मोफत वीज देण्याचा धाडसी निर्णय केला. तसेच खरीप आणि रब्बी हंगामात पेरणीपूर्व एकरी १० हजार रूपये थेट रोख मदत शेतकऱ्यांना केली. नैसर्गिक मृत्यू झाल्यास एकरकमी ५ लाख रूपये सानुग्रह अनुदान दिले. परिणामी तेलंगणा राज्यावरील शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसला गेला. तसेच वृद्ध, विधवा, निराधार महिला, कामगारांना दरमहा ३०१६/- रूपये रोख मदत करण्याचा निर्णय राबविला.

त्यांनी तेलंगणा सरकार प्रमाणे एकरी १० हजार रूपये मदत करण्याची शिंदे-फडणवीस सरकारला शिफारस केली. मात्र सरकारने ही शिफारस धुडकावून लावली. शेतकरी विरोधी काम करणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारला आता जागा दाखविण्याची वेळ आली आहे. मागील ७५ वर्षात आमदार, खासदारांनी राबविलेल्या चुकीच्या धोरणामुळे देशाला शेतकरी आत्महत्यांचा कलंक लागला आहे. के. चंद्रशेखर राव यांनी 'अब की बार, किसान सरकार चा नारा दिला आहे. के. चंद्रशेखर राव यांना देशाचे पंतप्रधानपदी विराजमान करण्याची शेतकरी संघटनेची भूमिका आहे. याला समर्थन देण्यासाठी मोठ्या संख्येने सन्मान सोहळ्याला उपस्थित राहावे ही विनंती आवाहन शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी केले आहे

0/Post a Comment/Comments