कढोली येथे विर शहीद जवान आत्माराम हुलके यांना श्रद्धांजली अर्पण




गजानन पुराम जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली 
  
 आज दिनांक 13 ते 15 आगस्ट या दरम्यान घरोघरी तिरंगा अर्थात हर घर तिरंगा या अभियानात सर्व नागरिकांनी सामील व्हावे आणि आपल्या घरावर तिरंगा फडकावावा असे गावातील नागरिकांना आवाहन करण्यात आले व ग्रामपंचायत कढोलीच्या वतीने आपल्या देशासाठी कार्यरत शहीद वीर झालेले स्वर्गीय आत्माराम बापू हुलके कढोली  
याना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली

त्यांची पत्नी ममता आत्माराम हुलके व त्यांची आई सावित्रीबाई बापूजी हुलके या वीर जवानाला श्रद्धांजली देऊ आत्म स्मरण केले . यावेळी ग्रामपंचायत कढोली चे ग्रामसेवक पडगिलवार सरपंच जितू हुलके, उपसरपंच अलका संदीप हुलके, दीपा योगपती वाकुडकर ग्रामपंचायत सदस्य, सुगंत बारसागडे ग्रामपंचायत सदस्य, मंगला दिलीप कोवे ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी जिल्हा परिषद शाळा कढोली मुख्याध्यापक कोडापे .तलांडे . शेडमाके जुवारे .पेंदाम मॅडम .व अंगणवाडी सेविका लता पुरुषोत्तम हुलके . शैला अनुप देशमुख व शाळेतील सर्व विद्यार्थी   
उपस्थित होते

0/Post a Comment/Comments