आरमोरी-गांगलवाडी मार्गे ब्रह्मपुरी जाणारी बस सकाळी सात वाजता सुरू करा-



महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आगार व्यवस्थापकाला निवेदनातून मागणी.....

 ब्रह्मपुरी.... ब्रह्मपुरी शहर हे शैक्षणिक शहर आहे म्हणून ओळखले जाते. त्यामुळे तालुक्यातून शेकडो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी वेगवेगळ्या महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी बसने प्रवास करतात. त्यातच सकाळी साडेसातला कॉलेज सुरू होते. मात्र बससेवेचा टाइमिंग विद्यार्थ्यांच्या प्रवासाशी जुळत नाही. मुख्यत्वे बस सेवेचा टाईम ८ते८:३०असल्यामुळे बसेस मधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज वेळेवर मिळत नाही. त्यामुळे तो टायमिंग बदलवून बसेसचा सात वाजताचा टाइमिंग द्यावा. जेणेकरून विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये पोहोचण्यासाठी सोयीचे होईल. अशी मागणी ब्रह्मपुरी तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ब्रह्मपुरी आगार व्यवस्थापकला निवेदनातून केली आहे. याबद्दलचे निवेदन माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांना सुद्धा देण्यात आले आहे.
     ब्रम्हपुरी तालुक्यातील सर्व महाविद्यालय विद्यार्थी गाव खेड्यात राहणारे आहोत. आमचे गाव (गांगलवाडी, मुई, रुई, निलज, पाचगाव, खरकाडा, रणमोचन, किन्ही, बरडकिन्ही, चिचगाव, गोगाव ,तळोधी, वांद्रा, आवळगाव, डोरली तर काही विद्यार्थी आरमोरी वरून सुद्धा येतात) हे ब्रम्हपुरी पासून १५-२० किलोमीटर अंतरावर आहे, आम्ही विद्यार्थी ब्रम्हपुरी शहरातील वेगवेगळ्या महाविद्यालय मध्ये शिक्षण घेत आहोत. सर्वच महाविद्यालयाचा वेळ हा सकाळ (स. ७.३० ते ११.३० )पाळीला आहे.  
       राष्ट्रीय महामार्गावरून जाणारी बस हि वेळेत येत नसल्यामुळे आम्हाला खूप मनस्ताप सहन करावा लागते. सकाळी आमचे महाविद्यालय ७.३० सुरु होत असते. परंतु आरमोरी/गांगलवाडी मार्गे ब्रम्हपुरी येणारी बस सकाळी ८.०० वाजता दरम्यान येत असल्यामुळे आम्हाला महाविद्यालयांत पोहचायला ८.३० ते ९.०० वाजतात त्यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच ब्रम्हपुरी वरून आरमोरी/गांगलवाडी मार्गे जाणाऱ्या बसचा काही निश्चित वेळ नसल्यामुळे तासंनतास बस स्टॉप वर ताटकळत बसची वाट पाहत उभे राहावे लागते. ती कधी दुपारी १.०० तर कधी २.०० ला येत असल्यामुळे प्रचंड मनस्ताप होतो. त्वरित आमच्या मागणी संदर्भात वेळीच लक्ष देऊन त्वरित बस सेवा सुरू करावी अशी मागणी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आगार व्यवस्थापक यांना निवेदनातून केली आहे. आगार व्यवस्थापकांना निवेदन देतांना गणेश शेंन्डे, कुणाल राऊत, प्रशांत डांगे (पत्रकार) सोबत उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments