तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दोनशे महिलांचा बीआरएस मध्ये प्रवेश




गडचिरोली वार्ता न्युज

भारत राष्ट्र समिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्र राज्याचे नेते प्रशांत नवगिरे यांच्या उपस्थितीत नळदुर्ग शहरातील दोनशे महिलांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला. नवगिरे यांनी सर्वांचे स्वागत केले.

प्रशांत नवगिरे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, बी आर एस पक्षाच्या माध्यमातून व महाराष्ट्र राज्याचे प्रभारी के. वामशीधर राव यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील वंचित,उपेक्षित व शोषितांच्या सर्वांगिण विकासासाठी आपण सतत प्रयत्नशील असुन शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ या सर्वांना मिळवून देण्यासाठी व अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

या कार्यक्रमात कांही महिलांनी बसंतनगर, दुर्गानगर व घरकुल येथील पथदिवे बंद आहेत. गटारी तुबलेल्या असुन याठिकाणी गवत मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून येथील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. असे प्रशांत नवगिरे यांना सांगताच नवगिरे यांनी तात्काळ नळदुर्ग नगर परिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांना फोन लावला व याबाबत माहिती दिली. मुख्याधिकारी कुंभार यांनी, आपण तातडीने याबाबत कार्यवाही करू असे सांगुन स्वच्छता निरीक्षक यांचेसोबत स्वच्छता पथक आणि कामगार पाठवुन लगेच संबंधित ठिकाणची स्वच्छता सुरु केली. यामुळे या भागातील नागरीक व महिलांनी बीआरएसचे नेते प्रशांत नवगिरे, त्यांची टीम आणि नळदुर्ग नगरपरिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांचे अभिनंदन करून आभार मानले.

या कार्यक्रमास बीआरएस पक्षाचे जिल्हा मिडीया समन्वयक सुनिल गव्हाणे, नळदुर्ग शहर समन्वयक अजहर शेख, अहमदअली मनीयार, विरेंद्र पाटील, रंजना ठोंबे, यशोदा बनसोडे, आश्विनी नागिले, कस्तुरा चौगुले, शांता सामोसे, हलिमा शेख, जायनबी नदाफ, अमिना शेख, तस्लिम कुरेशी, आयेशा शेख यांच्यासह महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments