नक्षलग्रस्त गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील ७१ हजार कुटुंबांना मोफत डीटीएच कनेक्शन देणार


(प्रतिकात्मक फोटो)

केंद्र शासनाचा निर्णय.

पोलीस विभाग तयार करणार लाभार्थी कुटुंबियांची यादी


सौ.निलिमाताई बंडमवार
सल्लागार

गडचिरोली:- देशपातळीवर सर्व नक्षल प्रभावित जिल्ह्यांमध्ये डीटीएच कनेक्शन मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याचा महाराष्ट्रातील गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांतील ७१ हजार कुटुंबांना लाभ मिळणार आहे लाभार्थी कुटुंबीयांची यादी पोलिसांकडून तयार करण्यात येत असल्याची माहिती गडचिरोलीचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली.गोंदिया जिल्ह्यामधील नक्षल प्रभावित क्षेत्रातील १५९ गावांत केंद्रीय गृह विभाग आणि केंद्रीय माहिती प्रसारण विभागाच्या वतीने तब्बल ११५६ कुटुंबांना डीटीएच कनेक्शन मोफत दिले जाणार आहे. त्याअंतर्गत या कुटुंबांच्या घरात सेटटॉप बॉक्स आणि डीटीएचसाठीची डिश दिली जाणार आहे.

या भागातील जनतेला इन्फर्मेशन कनेक्टिव्हिटी मिळावी आणि नक्षलवाद्यांच्या खोट्या प्रचारापासून त्यांची सुटका व्हावी या उद्देशाने ही अभिनव योजना राबवण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले. केंद्रीय गृह विभाग आणि माहिती व प्रसारण विभागाकडून ही अभिनव योजना सुरू केली. गडचिरोली आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांतील नक्षल प्रभावित क्षेत्रातील ७१ हजार कुटुंबांना योजनेंतर्गत सेट टॉप बॉक्स आणि डीटीएचसाठीची डिश दिली जाणार आहे. याशिवाय चीनच्या सीमेवरील जिल्ह्यांमध्येही इन्फर्मेशन कनेक्टिव्हिटीची योजना राबवली जाईल. सीमेवरील किंवा संवेदनशील भागातील जनतेला इन्फर्मेशन कनेक्टिव्हिटी मिळावी आणि त्यांच्या माध्यमातून अचूक माहिती पोहोचावी, येथील जनतेला देशविघातक शक्तींच्या अपप्रचारापासून वाचवणे हा या योजनेचा हेतू आहे.महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा अजूनही विकासाच्या छोट्या छोट्या गोष्टीपासून वंचित असलेला जिल्हा आहे. गडचिरोलीत शासनाला आपल्या योजनांची अचूक माहिती पोहोचवणे हेही एक मोठे आव्हान असते. त्यासाठीच केंद्र सरकारने केंद्रीय गृह विभाग आणि माहिती व प्रसारण विभागाच्या माध्यमातून योजना आखली आहे.

नक्षल प्रभावित भागातील जनतेला इन्फॉर्मेशन कनेक्टिव्हिटी मिळावी आणि नक्षलवाद्यांच्या खोट्या प्रचारापासून त्यांची सुटका व्हावी, या उद्देशाने ही अभिनव योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पुढील काही महिन्यांमध्ये देशपातळीवर सर्व नक्षल प्रभावित जिल्ह्यांमध्ये लाखो डीटीएच कनेक्शन मोफत दिले जाणार आहेत

0/Post a Comment/Comments