भारत राष्ट्र समितीच्या नेत्याने सामाजिक दायित्व जपत केला अनोखा वाढदिवस साजरा

  




 चंद्रपूर :- सामाजिक दायित्व जपत जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात शिक्षण घेणाऱ्या गरजवंत चिमुकल्या विद्यार्थ्यांना पुस्तके, पेन व पेन्सिल अश्या आवश्यक व शिक्षणापयोगी साहित्य भेट देत भारत राष्ट्र समिती चे नेते भूषण फुसे चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम व मागास भाग असलेल्या जिवती तालुक्यातील जिल्हा प्राथमिक शाळा येल्लापुर, जिल्हा परिषद शाळा लांबोरी, जिल्हा प्राथमिक शाळा शेंनगाव व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पलैझरी येथे भारत राष्ट्र समितीचे नेते भुषण भाऊ फुसे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरिब गरजु शाळेतिल विद्यार्थ्यांना पुस्तके, बुक व पेन्सिल वाटप करुन जिवती तालुक्यातील गावा गावात जाऊन प्रत्येक शाळेत भेट देण्यात आली. 

यावेळी उपस्थित भुषण फुसे, राकेश चिलकुलवार युवा नेते राजुरा, स्वाति मांदाडे महीला भारत राष्ट समिती नागपुर विभाग, राकेश ठाकुर चंद्रपूर, सुबोध चिकटे भारत राष्ट समिती जिवती तालुका युवा समन्वयक, बालाजी करले तालुका समन्वयक शाखा प्रमुख येल्लापुर, भारत कांबळे, धमरत्न भुतके, सतिष क्षिरसागर, विशाल कांबळे, श्रिमंत कांबळे, एस टी प्रमुख बालाजी सिडाम, विजय राठोड जिवती येथिल शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख तसेच तिन्ही शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विध्यार्थी इत्यादी सर्व उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments