किती दिवस अंधाराचा सामना करावा लागणार, ग्रामस्थांचा सवाल




मार्कंडा कंन्सोबा ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष


चामोर्शी (आष्टी) : तालुक्यातील मार्कंडा कंन्सोबा येथील गावातील काही खांबाचे पथदिवे एक दिड महिन्यांपासून बंद आहेत.
पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने मार्कंडा कंन्सोबा येथील नागरिकांना पावसाळ्यात अंधाराचा सामना करावा लागत आहे. गावातील काही खांबाचे बंद असलेले पथदिवे लावण्यासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाला तोंडी सांगण्यात आले असता त्यावर किती पथदिवे बंद आहेत याची चौकशी करून लावण्यात येईल असे सांगण्यात आले परंतु आज एक महिन्याचा कालावधी होऊनही बंद असलेले पथदिवे लावण्याकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. आता किती दिवस अंधाराचा सामना करायचा असा सवाल ग्रामस्थांकडून केले जात आहे.
गावातील बंद असलेले पथदिवे चौकशी करण्यास वेळ लागतो आहे का?
मग बंद असलेले पथदिवे लावत का नाहीत? गृहकरामध्ये तर विज कर जोडला जातो आणि गृहकरासोबत वीज कर वसूल केला जातो मग पावसाळा सुरु असुनही काही बंद असलेले पथदिवे लावण्याकडे एवढे दुर्लक्ष का केले जात आहे असा सवाल ग्रामस्थांकडून केल्या जात आहे.

0/Post a Comment/Comments