नीट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक व सत्कार! माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या शुभहस्ते




अहेरी:- वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी अत्यंत महत्वाची असलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेत (नीट) येथील राज मोरेश्वर नामनवार आणि मुंकशिद मजहर खान हे दोन विद्यार्थी नीट यूजी -2023 च्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केल्याने शनिवारी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी राज नामनवार आणि मुंकशीद खान यांचे कौतुक, सत्कार व गौरव करून पालकांचे अभिनंदन केले आणि संवाद साधले.
   उल्लेखनीय म्हणजे राजचे वडील मोरेश्वर नामनवार आणि मुंकशिदचे वडील मजहर खान दोघे शालेय जीवनातील व क्रिकेट खेळातील खास जिवलगमित्र असून वडिलांच्या मैत्रीची जोड़ी मुलांच्या यशाने प्रकाश झोतात आले आहे. 
     विशेष म्हणजे मुंकशिदची बहिण सुद्धा या आधी नीट परीक्षेत उत्तीर्ण होऊन एमबीबीएस साठी प्रवेश मिळवून वैद्यकीय शिक्षण घेत आहे.
     माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम दोन्ही नीट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे थेट घर गाठुन कौतुक व सत्कार करून पालकांचे अभिनंदन केले आहे.
   त्यांच्यासमवेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, नगरसेवक अमोल मुक्कावार, मखमूर शेख, पीतांबर कुळमेथे होते.

0/Post a Comment/Comments