लोकसभा क्षेत्र समन्वयकांनी आरमोरी विधानसभेत दौरा करून पदाधिकारी व आमदारासोबत केली चर्चा





गडचिरोली :- दि. 7 आगस्ट
     
    भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री तथा लोकसभा क्षेत्र समन्वयक प्रमोदजी पिपरे यांनी काल दिनांक 6 ऑगस्ट रोजी महाविजय 2024 जनसंपर्क अभियाना अंतर्गत आरमोरी विधानसभा क्षेत्राचा दौरा केला व वडसा येथे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णजी गजबे व भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली तसेच आगामी कार्यक्रम व नियोजनाची माहिती दिली. याप्रसंगी आम. कृष्णाजी गजबे, वडसा नप चे माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, सोशल मीडियाचे पूर्व विदर्भ संयोजक आनंद खजांची, गणपत सोनकुसरे जिल्हा उपाध्यक्ष, वसंतराव दोंनाडकर तालुका महामंत्री, ओमकार मडावी सोशल मीडिया सहसंयोजक, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सागर नाकाडे, शंकर पारधी सदस्य ग्रामपंचायत कुरुड, वॉर रूमचे सदस्य जगतराम ठेंगरी, कुलदीप आमले, निशांत नेवारे, रजत कुथे व भाजप पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.*

    *याप्रसंगी लोकसभा क्षेत्र समन्वयक प्रमोद पिपरे यांनी आम. कृष्णाजी गजबे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट दिली असता आम. कृष्णाजी गजबे व पदाधिकाऱ्यांनी प्रमोद पिपरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व लोकसभा क्षेत्र समन्वयक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यानंतर प्रमोद पिपरे यांनी भाजपा पदाधिकारी तसेच आम कृष्णाजी गजबे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली व वॉर रुम, सोशल मीडिया टीम, मंडल समिती, बुथ समित्या तसेच शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख इत्यादी बाबत माहिती जाणून घेतली व वॉर रुम व सोशल मीडिया टीम चांगली व मजबूत असल्याने समाधान व्यक्त केले.*

  *याप्रसंगी आगामी नियोजन व कार्यक्रमाची माहिती देताना प्रमोद पिपरे यांनी सांगितले की, आरमोरी विधानसभा क्षेत्रात 100 ते 150 पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एक टीम तयार करून त्या टीमला चांगले सक्षम व मजबूत बनवून त्या शंभर लोकांना एका व्यक्तीला तीन बुथाचे प्रभार देण्यात यावे, विधानसभा कोअर ग्रुप 15 लोकांचे गठन करण्यात यावे, प्रत्येक बुथावर पक्षाचे नियमित 6 कार्यक्रम होतील याबाबत योजना तयार करणे, 16 ऑगस्ट 2023 पर्यंत 15 हजार नव मतदार नोंदणी करणे , प्रत्येक विधानसभेत जनसंघ व भाजपाचे वरिष्ठ ते ज्येष्ठ अशा 500 नागरिकांची यादी तयार करणे. फ्रेंड्स ऑफ बीजेपी , धन्यवाद मोदीजी अभियान, नव मतदार नोंदणी, युवा वारीयर्स यांचे प्रत्येकी 500 सदस्य तयार करणे, माननीय प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रात 23 ऑगस्ट 2023 रोजी प्रवास दौरा आहे त्यानिमित्ताने प्रत्येक विधानसभेमध्ये घर चलो अभियान व प्रमुख 100 कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करणे अशी माहिती यावेळी लोकसभा क्षेत्र समन्वयक प्रमोद पिपरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिली.*
   *यावेळी लोकसभा क्षेत्र समन्वयक प्रमोद पिपरे यांनी आम. कृष्णाजी गजबे यांच्या आरमोरी विधानसभा क्षेत्राची संपुर्ण माहिती जाणून घेतली व भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी परिश्रम घेण्याचे आवाहन केले व तालुका व मंडल कार्यकारिणी अधिक सक्षम करून निवडणुकांमध्ये बुथ महत्वाचे असल्याने बुथाकडे लक्ष केंद्रित करून बुथ समिती अधिक सक्षम करण्यावर भर द्यावा असे आवाहन यावेळी प्रमोद पिपरे यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.*

0/Post a Comment/Comments