महामंडळ तर्फे बंद करण्यात आलेले बस सेवा परत सुरु करा



भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष यांनी केली खासदार अशोक नेते यांच्याकडे निवेदनातून मागणी 

राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली 

 आधि महामंडळ तर्फे सुरु असलेले १) एटापल्ली-गडचिरोली, बस सकाळी ७:३० वाजता जाणारी २) एटापल्ली-चंद्रपुर जाण्यासाठी सकाळी १०:०० वा. सुरु असलेली बस ३) गडचिरोल-एटापल्ली सायंकाळी ८.३० वाजता मुक्कामी येणारे हे तिनही बस सध्या स्थितीत बंद करण्यात आलेले आहे.

त्यामुळे एटापल्ली तालुक्याचे रहिवासी असणारे जनतेला, बाहेर गावी गेल्या नंतर सायंकाळी परत आपल्या गावाला येण्याचे कोणतेही साधन नाही. त्यामुळे येथील जनतेला अडचण निर्माण होत आहे. ज्या बसची सुविधा आधि सुरु होती. त्याच प्रमाणे परत बसची सुविधा सुरु करण्यात यावी. जेणे करुन लोकांना होत असलेला त्रास कमी होणार.

करीता वरील सर्व बसेस सुरु करुण सहकार्य करण्याची मागणी एटापल्ली येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी खासदार अशोक नेते यांच्याकडे निवेदनातून बाबुरावजी गंपावर - माजी तालुका अध्यक्ष
,निखिल गादेवार - भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गडचिरोली,प्रसाद पुल्लूरवार - माजी तालुका महामंत्री,सुधाकर जी नाईक - माजी जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली यांनी केली आहे

0/Post a Comment/Comments