भारत राष्ट्र समितीच्या महाराष्ट्रातील दुसऱ्या महिला सरपंच पदी बिनविरोध निवड




मौजे अंबेलोहळ ता. गंगापुर येथील ग्रामपंचायत मध्ये भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष तेलंगणाचे मुख्यमंत्री मा. के चंद्रशेखर राव यांच्या विकासावर विश्वास ठेवून भारत राष्ट्र समिती पक्षाचे महाराष्ट्राचे नेते श्री अण्णासाहेब माने यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री संतोष माने यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील दुसऱ्या सरपंच पदी सौ. प्रतिभा राजेश दाभाडे यांची बिनविरोध निवड झाली.

काही दिवसांपूर्वीच भारत राष्ट्र समिती पक्षाच्या महाराष्ट्रात प्रथम सरपंच म्हणून गंगापुर तालुक्यातील सावखेडा ग्रामपंचायत मध्ये सौ सुषमा विष्णू मुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती

या वेळी चंद्रभान दाभाडे, किसन गवळी मा सरपंच, बाजीराव चोरमारे ग्रा सदस्य, कल्याण प्रधान ग्रा सदस्य, युसुफ युनूस शेख, विजय थोरात ग्रा सदस्य, मधुकर उगले ग्रा सदस्य, विष्णु प्रधान ग्रा सदस्य, रमेश नीचीत मा सरपंच, सुधाकर बर्वे ग्रा सदस्य, गफार पठाण ग्रा सदस्य, वसंत प्रधान, आनंद गवळी पोलीस पाटील, सुभाष मेजर मा. ग्रा सदस्य, भगवान वेळनकर, राजू बत्तिषे, नवनाथ बरबडे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते सर्वांनी नवनिर्वाचित सरपंचांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

0/Post a Comment/Comments